प्योंगयांग, 4 फेब्रुवारी: उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांचा घोड्यावर बसलेला (Horse riding) एक प्रपोगंडा व्हिडिओ (Propaganda Video) सध्या रिलीज करण्यात आला आहे. किम जोंग याची देशातील जनतेच्या नजरेत प्रतिमा सुधारण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याची माहिती आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लागोपाठ 7 मिसाईलच्या चाचण्या करून आक्रमकतेचं प्रदर्शन केलेल्या किम जोंग यांची मानवतावादी प्रतिमा तयार करण्याचा हा प्रयत्न असून त्यासाठी त्यांना पांढऱ्या घोड्यावर बसल्याचं दाखवण्यात आलं आहे. पांढरा घोडा आणि विकास पांढरा घोडा हे उत्तर कोरियातील राजघराण्याच्या परंपरेचं प्रतीक आहे. किम जोंग यांचे वडील आणि इतर पूर्वजही पांढऱ्या घोड्यावर स्वार होणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानत. सामान्य जनतेच्या नजरेत राजाची प्रतिमा ही पांढऱ्या घोड्यावर बसलेली अशीच आहे. याचाच वापर करत किम जोंग स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. सध्या उत्तर कोरियाला भेडसावणाऱ्या समस्यांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. उत्तर कोरियात भयाण दुष्काळ गेल्या दोन वर्षांपासून उत्तर कोरियात भीषण दुष्काळ पडला आहे. कोरोनामुळे देशाने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे चीनसह इतर देशांतून होणारी अन्नधान्याची आयात पूर्णतः थांबली आहे. या निर्णयामुळे उत्तर कोरियात कोरोनाचा शिरकावच झाला नाही, असा दावा करण्यात येत असला तरी त्यामुळे जनतेला भीषण दुष्काळ आणि महागाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. या प्रश्नांवर तोडगा काढू न शकल्यामुळे किम जोंगची लोकप्रियता कमी होत असल्यामुळे ती पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न म्हणून हा व्हिडिओकडे पाहिलं जात आहे. हे वाचा - ..अन् चक्क Robot ने मानवी मदतीशिवाय केली सर्जरी, वाचा यशस्वी ठरलं का हे ऑपरेशन? दुष्काळात घटलं वजन दुष्काळानं जसे सर्वसामान्यांचे हाल झाले, तसेच आपलेही झाले हे दाखवण्याचा प्रयत्नही किम जोंगच्या या व्हिडिओत केला आहे. अगोदर आपल्या जाडजूड देहयष्टीसाठी ओळखला जाणारा किम जोंग या व्हिडिओत बारीक झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. जिन्यावरून हळूहळू एकेक पायरी उतरत येणारा किम जोंगही दुष्काळानं बारीक झाल्याचं जनतेला समजावं, हा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.