Home /News /videsh /

...अन् चक्क Robot ने मानवी मदतीशिवाय केली सर्जरी, वाचा यशस्वी ठरलं का हे ऑपरेशन?

...अन् चक्क Robot ने मानवी मदतीशिवाय केली सर्जरी, वाचा यशस्वी ठरलं का हे ऑपरेशन?

अमेरिकेत डॉक्टर, टेक्निशियन यांच्या मदतीविना स्वतंत्रपणे रोबोटनं सर्जरी केली आहे. (फोटो सौजन्य- BBC)

अमेरिकेत डॉक्टर, टेक्निशियन यांच्या मदतीविना स्वतंत्रपणे रोबोटनं सर्जरी केली आहे. (फोटो सौजन्य- BBC)

अमेरिकेत डॉक्टर, टेक्निशियन यांच्या मदतीविना स्वतंत्रपणे रोबोटनं सर्जरी केली आहे. या वेळी डॉक्टर, तज्ज्ञ आणि टेक्निशियन्स यांनी रोबोटवर केवळ नजर ठेवली. विशेष म्हणजे ही सर्जरी यशस्वी झाली आहे.

बाल्टीमोअर, 04 फेब्रुवारी: गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात (Medical Sector) प्रगत तंत्रज्ञानाचा (Technology) वापर वाढतोय. विशेषतः सर्जरीसाठी (Surgery) प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. आज अनेक दुर्धर आजारांमध्ये सर्जरीसाठी रोबोटिक सर्जरीचा (Robotic Surgery) पर्याय वापरला जातो. अत्यंत प्रगत समजल्या जाणाऱ्या या तंत्रात डॉक्टर, टेक्निशियन रोबोटला विशिष्टप्रकारे मार्गदर्शन करून सर्जरी करतात. परंतु, आता या तंत्रातला पुढचा टप्पा अमेरिकेत (America) यशस्वी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेत डॉक्टर, टेक्निशियन यांच्या मदतीविना स्वतंत्रपणे रोबोटनं सर्जरी केली आहे. या वेळी डॉक्टर, तज्ज्ञ आणि टेक्निशियन्स यांनी रोबोटवर केवळ नजर ठेवली. विशेष म्हणजे ही सर्जरी यशस्वी झाली आहे. जगात प्रथमच रोबोटनं कोणत्याही मानवी मदतीशिवाय रुग्णावर यशस्वीरीत्या सर्जरी केली आहे. ही रोबोटिक सर्जरी अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीत (Johns Hopkins university) पार पडली. सर्जरीदरम्यान, सर्जन, डॉक्टर किंवा टेक्निशियनने रोबोटला कोणतेही निर्देश दिले नाहीत. स्मार्ट टिश्यू ऑटोनॉमस रोबोट (Smart Tissue Autonomous Robot) असं या रोबोचं नाव आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या रोबोटनं एका डुकरावर (Surgery on Pig) इंटेस्टाइनल अ‍ॅनास्टोमोसिस नावाची सर्जरी केली. या वेळी रोबोटने पोटाच्या दोन भागांतील जखम भरून काढली आणि दोन्ही भागांना टाकेही (stitches) घातले. हे वाचा-WOW! पार्टिशन करताच बदलतो रंग; पाहा 11 वर्षांच्या मुलीचे 'जादुई केस' या रोबोटमध्ये व्हिजन गायडेड सिस्टीम बसवण्यात आली आहे. या प्रणालीच्या मदतीनं रोबोट सॉफ्ट टिश्यू यशस्वीपणे शिवू शकतो. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतले इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजिनीअरिंगचे प्राध्यापक क्रिगर आणि जिन कॉंग, तसंच वॉशिंग्टन डीसी इथल्या चिल्ड्रन नॅशनल हॉस्पिटलमधल्या तज्ज्ञांनी हा रोबोट विकसित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रोबोट काम करत होता; मात्र अलीकडेच शास्त्रज्ञांनी त्यात अत्याधुनिक फीचर्सचा समावेश केला आहे. त्याचे हात नवीन सर्जरीच्या साधनांसह अपग्रेड केले गेले आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, संशोधन पथकातले सदस्य प्राध्यापक एक्झेल क्रिगर यांनी सांगितलं कि, 'अमेरिकेत दर वर्षी अशा लाखो सर्जरी होतात. अशा सर्जरी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असतात. सर्जरीदरम्यान थोडासाही निष्काळजीपणा झाल्यास रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो; मात्र नवीन रोबोटिक सर्जरीमुळे हे काम सोपं झालं आहे.' 'हा रोबोट जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी विकसित केला आहे. या स्मार्ट टिश्यू ऑटोनॉमस रोबोटनं एका डुकराची सर्जरी केली आहे. यापूर्वी त्यानं चार वेगवेगळ्या जनावरांवर (Animals) शस्त्रक्रिया केली होती. मानवी मदतीशिवाय करण्यात आलेल्या या सर्जरीचे रिझल्ट आश्चर्यकारक होते. रोबोटने केलेली सर्जरी सर्जनने केलेल्या सर्जरीजच्या तुलनेत खूप अचूक होती,' असं क्रिगर यांनी सांगितलं. हे वाचा-7 फेब्रुवारापासून सुरू होतोय प्रेमाचा 'खास' आठवडा; अशाप्रकारे करा साजरा 'या नव्या प्रयोगातून एक गोष्ट स्पष्ट झाली, की भविष्यात रोबोट मानवी मदतीशिवाय सर्जरी करू शकतील. या रोबोटने आतड्यांसंबधी अ‍ॅनास्टोमोसिस सर्जरी केली आहे. सर्जरी करताना रोबोटने पोटाचे दोन्ही भाग ज्याप्रकारे जोडले ते कौतुकास्पद होतं. असे टाके सर्जनसुद्धा घालू शकत नाहीत. यामुळे डाग पडण्याचा धोका कमी होतो,' असं क्रिगर यांनी सांगितलं.
First published:

Tags: International, Pet animal, Surgery, Tech news, Technology, Wellness

पुढील बातम्या