मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! जबड्यात हात धरून फरफटत नेलं आणि...; आणखी एका कुत्र्याच्या हल्ल्याचा भयानक VIDEO

बापरे! जबड्यात हात धरून फरफटत नेलं आणि...; आणखी एका कुत्र्याच्या हल्ल्याचा भयानक VIDEO

कुत्र्याने मुलावर केला भयंकर हल्ला.

कुत्र्याने मुलावर केला भयंकर हल्ला.

एका भटक्या कुत्र्याने एका मुलावर हल्ला केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kerala, India
  • Published by:  Priya Lad

तिरुवनंतपुरम, 12 सप्टेंबर : गेले काही दिवस कुत्र्यांच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ समोर आले होते. बहुतेक व्हिडीओ हे दिल्लीतीलच होते. जिथं पाळीव कुत्र्यांनी हल्ला केला होता. आता केरळमधील कुत्र्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका भटक्या कुत्र्याने एका मुलावर हल्ला केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धडकी भरवणारं असं हे दृश्य आहे.

केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील ही घटना. एक मुलगा सायकलवरून जात होता. त्याचवेळी रस्त्यावरील एक कुत्रा त्याच्या दिशेने धावत आला. कुत्र्याने मुलाला सायकलवरून जमिनीवर पाडत त्याचा हातपाय आपल्या जबड्यात धरला. त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला.

व्हिडीओत पाहू शकता गेटबाहेर रस्त्यावर येत मुलगा सायकलवर चढतो. जसा तो सायकल किंचितशी पुढे नेतो, तसा एक कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो. मुलगा सायकलवरून जमिनीवर कोसळतो. त्यानंतर कुत्रा त्याच्यावर हल्ला करत राहतो. त्याच्या हातापायांना चावतो. त्याचा हात जबड्यात धरून त्याला फरफटत नेताना दिसतो. त्यानंतर त्याच्या छातीवर बसूनही त्याला चावा घेण्याचा प्रयत्न करतो. मुलगाही आपला जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करताना दिसतो.

अखेर मुलगा कसाबसा उठतो. तेव्हाही कुत्र्याने त्याचा हात जबड्यात धरलेला असतो. मुलगा तसंच त्याला खेचत नेतो आणि गेटच्या आत जातो. जसा तो गेटच्या आत घुसतो, तसा कुत्रा त्याला सोडून देतो आणि तिथून निघून जातो.  r/Kerala नावाच्या रेडिट अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

हे वाचा - महिलेचा जीव घेणाऱ्या 'पिटबुल'ने 10 वर्षांच्या चिमुकल्याला बनवली शिकार; कोवळ्या गालाचा लचका तोडला

बोस्टन युनिव्हर्सिटीच्या FM रेडिओ WBUR शी बोलताना एक व्यावसायिक श्वान प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ अॅनिमल बिहेव्हियर कन्सल्टंट्स (IAABC) चे कार्यकारी संचालक मार्जी अलोन्सो म्हणाले की, कुत्रा तसा फारसा आक्रमक नसतो. अनेकदा कुत्रे जेव्हा उत्तेजित होतात तेव्हा ते खूप उत्साही असतात, मग ते शिकार किंवा सुरक्षिततेच्या बाबतीत असोत. त्यावेळी, हा उत्साह वाढतो आणि त्यावेळी ते हल्ला करू शकतात, त्यावेळी कुत्रे खरोखर धोकादायक असतात, विशेषत: ते ग्रुपमध्ये असतील तेव्हा त्यांच्या तावडीत एखादा सापडला तर परिस्थिती फार गंभीर बनू शकते.

हे वाचा - सहज शिकार मिळेल म्हणून सिंहीण झेब्राच्या कळपात शिरली, पण अखेर घडलं असं काही की, शिकाऱ्याचीच शिकार झाली, पाहा Video

कुत्र्याचा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी, मार्झी अलोन्सो म्हणतात, अशा वेळी सरळ उभं राहा आणि खाली पाहा आणि त्याच्या डोळ्यात बघणं टाळा. मात्र, तुम्ही ओरडणं टाळू शकला तरच ही पद्धत प्रभावी आहे. दुसरा मार्ग म्हणजे सरळ कुत्र्याच्या अंगावर आपण धावून जाणं. यामुळे त्याला असं वाटतं की, तुमचा पाठलाग करून त्याला काही मिळणार नाही, उलट आपल्यामुळे त्याला धोका असल्याचे जाणवते.

कुत्रा हल्ला करायला आल्यावर लगेच काय करायचं?

- तुमच्या आणि कुत्र्यामध्ये काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करा, जसे की छत्री, कार किंवा वाहन, कचऱ्याची बादली किंवा ब्लँकेट.

- तुमच्या जवळ येत असलेल्या कुत्र्याला "ऐ थांब" किंवा "स्टॉप" यासारखे दटावणी देणारे शब्द जोरात, ध्यैर्यानं वापरा.

- त्याला लांब घालवण्यासाठी आपल्याकडे असल्यास अन्नपदार्थ दुसऱ्या दिशेला फेका. याचा अर्थ त्यांना ट्रीट द्या, ही ट्रिट जितकी लांब जाईल तितका वेळ तो तुमच्यापासून दूर जाईल आणि तुम्हाला सावध होण्यास आणखी वेळ मिळेल.

- जर कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असेल तर तुम्ही तो पट्टा कशाला तरी बांधून हँडलसारखं ओढू शकता. असं करताना चेहऱ्याचा किंवा शरीराचा कोणताही भाग कुत्र्याच्या तोंडाजवळ येऊ देऊ नका.

- सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही कुत्रा अंगावर चालून आल्यास लक्षात ठेवा की ओरडायचं नाही, पळायचं तर अजिबात नाही. कुत्र्याच्या डोळ्यात बघायचं नाही.

- तरीही तुमच्यावर हल्ला झाल्यास, तुम्ही ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे आणि कोणत्याही जखमांवर उपचार करणे महत्त्वाचे आहे.

First published:

Tags: Dog, Kerala, Other animal, Viral, Viral videos