मुंबई, 12 मे : कुत्रा हा अनेकांचा सर्वात प्रिय पाळीव प्राणी आहे. आपल्या अनेकांना गोंडस कुत्र्यांचे आणि पिल्लांचे व्हिडिओ ऑनलाइन पाहायला आवडतात. कधी कधी आपण शेजारी किंवा गल्लीत राहणाऱ्या कुत्र्यांशीही खेळायला लागतो, त्यांनाही ते आवडतं. बर्याचदा उद्यानातही लोक त्यांच्या कुत्र्यांना फिरायला घेऊन येतात. तेव्हा आपण काहींना हाका मारायला लागतो. काही वेळा काही कुत्रे लाडात शेपूट हलवत आपल्याकडे येतात. पण, काही कुत्रे फार भयंकर असतात, अचानक अज्ञात व्यक्तीच्या अंगावर धावून जातात आणि चावण्याचा प्रयत्न करतात. असं कधी-कधी रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या बाबतीतही घडतं. काही कुत्री थेट हल्ला करतात, ज्यामुळे आपल्याला गंभीर दुखापत देखील होऊ शकते, काही प्रकरणांमध्ये ते प्राणघातक देखील ठरू (What to do when Dog Attack) शकतं. कुत्रा अंगावर आल्यानंतर नेमकं काय करावं आणि तो चावणार नाही म्हणून काय खबरदारी घ्यावी. तसेच कुत्रे नेमके एखाद्यावर का हल्ला करतात त्याविषयी जाणून घेऊया. कुत्रे हल्ला का करतात? ‘द कॉन्व्हर्सेशन’ (The Conversation) नुसार, कुत्रे सहसा क्वचितच हिंसक असतात, कारण ते आक्रमकतेऐवजी भीती किंवा चिंतेंत असतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, मानवाने कुत्र्यांना त्यांचे पाळीव प्राणी आणि सोबती म्हणून प्रशिक्षित केले असल्याने, कुत्र्यांच्या नैसर्गिक वर्तनाला एक आकार देण्यात आला आहे जेणेकरून ते माणसांसोबत घरे आणि वातावरणाशी जुळवून घेऊ शकतात. तथापि, आपण कुत्र्यांच्या सर्व नैसर्गिक प्रवृत्ती (natural tendencies) सेट किंवा प्रशिक्षित करू शकत नाही. त्यामुळे कुत्र्याच्या सर्व हरकती नेहमीच सारख्या असू शकत नाहीत. बोस्टन युनिव्हर्सिटीच्या FM रेडिओ WBUR शी बोलताना एक व्यावसायिक श्वान प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ अॅनिमल बिहेव्हियर कन्सल्टंट्स (IAABC) चे कार्यकारी संचालक मार्जी अलोन्सो म्हणाले की, कुत्रा तसा फारसा आक्रमक नसतो. अनेकदा कुत्रे जेव्हा उत्तेजित होतात तेव्हा ते खूप उत्साही असतात, मग ते शिकार किंवा सुरक्षिततेच्या बाबतीत असोत. त्यावेळी, हा उत्साह वाढतो आणि त्यावेळी ते हल्ला करू शकतात, त्यावेळी कुत्रे खरोखर धोकादायक असतात, विशेषत: ते ग्रुपमध्ये असतील तेव्हा त्यांच्या तावडीत एखादा सापडला तर परिस्थिती फार गंभीर बनू शकते. हे वाचा - जांभूळ खाऊन बिया फेकू नका; रक्तातील साखर नियंत्रणावर असा होतो उपयोग कुत्र्यांचा हल्ला कसा टाळायचा? कुत्र्याचा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी, मार्झी अलोन्सो म्हणतात, अशा वेळी सरळ उभं राहा आणि खाली पाहा आणि त्याच्या डोळ्यात बघणं टाळा. मात्र, तुम्ही ओरडणं टाळू शकला तरच ही पद्धत प्रभावी आहे. दुसरा मार्ग म्हणजे सरळ कुत्र्याच्या अंगावर आपण धावून जाणं. यामुळे त्याला असं वाटतं की, तुमचा पाठलाग करून त्याला काही मिळणार नाही, उलट आपल्यामुळे त्याला धोका असल्याचे जाणवते. कुत्रा हल्ला कराय आल्यावर लगेच काय करायचं - - तुमच्या आणि कुत्र्यामध्ये काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करा, जसे की छत्री, कार किंवा वाहन, कचऱ्याची बादली किंवा ब्लँकेट. - तुमच्या जवळ येत असलेल्या कुत्र्याला “ऐ थांब” किंवा “स्टॉप” यासारखे दटावणी देणारे शब्द जोरात, ध्यैर्यानं वापरा. - त्याला लांब घालवण्यासाठी आपल्याकडे असल्यास अन्नपदार्थ दुसऱ्या दिशेला फेका. याचा अर्थ त्यांना ट्रीट द्या, ही ट्रिट जितकी लांब जाईल तितका वेळ तो तुमच्यापासून दूर जाईल आणि तुम्हाला सावध होण्यास आणखी वेळ मिळेल. हे वाचा - रोजच्या या चुकीच्या सवयीमुळे अनेकांची सेक्शुअल लाइफ होतेय खराब; वेळीच Alert व्हा - जर कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असेल तर तुम्ही तो पट्टा कशाला तरी बांधून हँडलसारखं ओढू शकता. असं करताना चेहऱ्याचा किंवा शरीराचा कोणताही भाग कुत्र्याच्या तोंडाजवळ येऊ देऊ नका. - सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही कुत्रा अंगावर चालून आल्यास लक्षात ठेवा की ओरडायचं नाही, पळायचं तर अजिबात नाही. कुत्र्याच्या डोळ्यात बघायचं नाही. - तरीही तुमच्यावर हल्ला झाल्यास, तुम्ही ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे आणि कोणत्याही जखमांवर उपचार करणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.