अमित राणा/गाझियाबाद, 08 सप्टेंबर : काही आठवड्यांपूर्वी पिटबुल जातीच्या पाळीव कुत्र्याने एका महिलेचा जीव घेतला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी लिफ्टमध्ये आधी एका लहान मुलावर आणि नंतर एका तरुणावर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते आणि आताही कुत्र्याने एका चिमुकल्यावर भयानक हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आले. ज्या पिटबुल जातीच्या कुत्र्याने लखनऊतील महिलेचा जीव घेतला त्याच जातीच्या कुत्र्याने या मुलावर हल्ला केला आहे. दिल्ली एनसीआरमधून गेले काही दिवस कुत्र्यांच्या हल्ल्याचे असे व्हिडीओ समोर येत आहेत. गाझियाबाद आणि नोएडातील लिफ्टमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यानंतर गाझियाबादमध्येच 10 वर्षांच्या चिमुकल्याला कुत्र्याने आपली शिकार बनवली. हा मुलगा बापूधाम क्षेत्रातील संजय नगरमधील एका पार्कमध्ये खेळत होता. त्यावेळी अचानक त्याच्यावर पिटबुलने हल्ला केला. हे वाचा - VIDEO - तरुणाने उत्साहाच्या भरात सिंहालाच मारली मिठी; त्याने जबड्यात हात धरला आणि… कुत्र्याने चिमुकल्यावर भयानक हल्ला केला. मुलाच्या चेहऱ्यावर त्याने चावा घेतला. चावून चावून त्याने मुलाच्या कोवळ्या गालाचे लचके तोडले. कशीबशी मुलाच्या कुत्र्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा गाल पूर्णपणे फाटला होता. डॉक्टरांनी त्याचा गाल आणि तोंड वाचवण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर टाके घातले. तब्बल 150 टाके या मुलाच्या चेहऱ्यावर पडले. हे वाचा - Viral video : महिलेच्या कानात शिरला साप, पिवळ्या सापाचा व्हिडीओ पाहून सर्वच हैराण माहितीनुसार ही घटना चार दिवसांपूर्वीची आहे. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबाने याची तक्रार दिली आहे. कुत्र्याच्या मालकाचं नाव ललित त्यागी असून तोसुद्धा संजय नगरमध्येच राहत असल्याचं सांगितलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.