नवी दिल्ली 27 मे : नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडिअममध्ये (Thyagraj Stadium) कुत्र्यासोबत वॉक करणे आयएएस अधिकारी संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) यांना चांगलंच महाग पडलं आहे. हे प्रकरण उघड होताच त्यांची लडाखमध्ये बदली करण्यात आली असून त्यांची पत्नी रिंकू डाग्गा यांची अरूणाचल प्रदेशमध्ये बदली करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. मात्र, यादरम्यान आता एका महिला अधिकाऱ्याची मन जिंकणारी कथा समोर आली आहे. ही महिला अधिकारी पुरग्रस्त भागात पूर्ण निष्ठेसह आपलं काम करत आहे आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ती चिखलातून चालायलाही मागेपुढे पाहात नाहीये. साडी चिखलाने भरलेल्या या महिला अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आम्ही भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) ज्या महिला अधिकाऱ्याबद्दल बोलत आहोत त्यांचं नाव कीर्ती जल्ली असं आहे (Keerthi Jalli Viral Photos). ज्या सध्या आसाममधील कचार जिल्ह्यात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. कचार जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील त्यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूरग्रस्तांपर्यंत पोहोचून सर्वतोपरी मदत केल्याबद्दल या महिला अधिकाऱ्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. कुत्र्याला स्टेडिअममध्ये फिरवणे महागात, IAS अधिकाऱ्याची लडाखमध्ये तर पत्नीची अरूणाचल प्रदेशमध्ये बदली आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पुराचा तडाखा बसला असून तेथील अनेक जिल्ह्यांतील हजारो लोकांना घरं सोडावी लागली आहेत. नुकत्याच आलेल्या पुरामुळे आसाममधील कचार हा सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे आणि 54,000 हून अधिक लोक अजूनही जिल्ह्यातील 259 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी बुधवारी बोरखोला विकास गटातील अनेक पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या.
Keerthi Jalli IAS, Deputy Commissioner Cachar.🙏 pic.twitter.com/n5CsOoAFMu
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) May 26, 2022
यादरम्यान, त्या साडी नेसून चिखल असलेल्या भागात फिरताना दिसल्या. त्यांच्या या फोटोंनी सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं. जिल्हा प्रशासनाच्या फेसबुक पेजवर सुरुवातीला हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले. संतापजनक! IAS अधिकाऱ्यांना कुत्रे घेऊन फिरण्यासाठी खेळाडूंची स्टेडिअमधून हकालपट्टी डीसी कीर्ती जल्ली म्हणाल्या की, त्यांना सखल भागात भेट देऊन व्यावहारिक मुद्द्यांचं आकलन करायचं आहे. जेणेकरून भविष्यासाठी एक चांगला कृती आराखडा तयार करण्यात जिल्हा प्रशासन आणि सरकारला मदत होईल. त्या म्हणाल्या, “स्थानिक लोकांनी सांगितलं की ते गेल्या 50 वर्षांपासून याच समस्येचा सामना करत आहेत. मला वाटलं की मला तिथे जाऊन वास्तविक समस्या पाहण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी त्याठिकाणी पाहणी करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पूर आलेला असतानाचा काळ." जिल्ह्यातील उपायुक्त त्यांच्या गावी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. बराक नदीला आलेल्या पुरामुळे दरवर्षी येणाऱ्या समस्या त्यांनी सविस्तरपणे सांगितल्या. भविष्यात होणारं नुकसान कमी करता यावं, यासाठी गावाच्या सुरक्षेवर भर देणार असल्याचं उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी सांगितलं.