Home /News /sport /

कुत्र्याला स्टेडिअममध्ये फिरवणे महागात, IAS अधिकाऱ्याची लडाखमध्ये तर पत्नीची अरूणाचल प्रदेशमध्ये बदली

कुत्र्याला स्टेडिअममध्ये फिरवणे महागात, IAS अधिकाऱ्याची लडाखमध्ये तर पत्नीची अरूणाचल प्रदेशमध्ये बदली

नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडिअममध्ये (Thyagraj Stadium) कुत्र्यासोबत वॉक करणे आयएएस अधिकारी संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) यांना चांगलंच महाग पडलं आहे.

    मुंबई, 27 मे : नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडिअममध्ये  (Thyagraj Stadium) कुत्र्यासोबत वॉक करणे आयएएस अधिकारी संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) यांना चांगलंच महाग पडलं आहे. हे प्रकरण उघड होताच त्यांची लडाखमध्ये बदली करण्यात आली असून त्यांची पत्नी रिंकू डाग्गा यांची अरूणाचल प्रदेशमध्ये बदली करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या महसूल विभागाचे मुख्य अधिकारी असलेले संजीव खिरवार त्यागराज स्टेडिअममध्ये 'डॉग वॉक' (Dog Walk) करत असत. त्याचा फटका खेळाडूंना बसत असे. या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्रलायनं गंभीर दखल घेतली आहे. काय आहे प्रकरण? या प्रकरणात माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार 'गेल्या काही महिन्यांपासून खिरवार यांना संध्याकाळी स्टेडिअममध्ये डॉग वॉक करता यावा म्हणून खेळाडूंना लवकर मैदामाच्या बाहेर काढले जात असे. यापूर्वी रात्री 8.30 -9 पर्यंत खेळाडू त्यागराज स्टेडिअममध्ये सराव करत, पण खिरवार यांच्या फिरण्यात अडथळा नको म्हणून त्यांना संध्याकाळी 7 वाजताच मैदानाच्या बाहेर काढले जात असे. याचा परिणाम खेळाडूंच्या सरावावर होत होता. संजीव खिरवार  यांनी आपण कधी-कधी कुत्र्यासोबत इथं फिरायला येतो,  हे  मान्य केलं होतं.त्यामुळे सरावात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला होता. आपण कुत्र्याला कधीही ट्रॅकवर सोडत नाही, तसंच कोणत्याही खेळाडूला बाहेर जाण्यास कधी सांगितलं नाही, असा त्यांनी दावा केला होता. IPL 2022 दरम्यान ऋद्धीमान साहानं सोडली टीमची साथ, WhatsApp Group मधूनही बाहेर सरकारकडून गंभीर दखल खिरवार यांनी आरोप फेटाळल्यानंतरही या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली. त्यागराज स्टेडिअम हे दिल्ली सरकारच्या अंतर्गत येते. हे प्रकरण उघड होताच सर्व स्टेडिअम रात्री 10 वाजेपर्यंत खेळाडूंसाठी उघडी असतील असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनीही हा दुर्दैवी प्रकार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं ही कारवाई केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi, Sports

    पुढील बातम्या