Home /News /sport /

संतापजनक! IAS अधिकाऱ्यांना कुत्रे घेऊन फिरण्यासाठी खेळाडूंची स्टेडिअमधून हकालपट्टी

संतापजनक! IAS अधिकाऱ्यांना कुत्रे घेऊन फिरण्यासाठी खेळाडूंची स्टेडिअमधून हकालपट्टी

स्टेडिअमवर आयएएस (IAS) अधिकाऱ्यांना संध्याकाळी कुत्रे घेऊन फिरता यावे यासाठी खेळाडूंना बाहेर काढलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    मुंबई, 26 मे : कोणत्याही स्टेडिअमवर पहिला हक्क हा खेळाडूंचा असतो. वेगवेगळ्या प्रकारातील सामन्यांबरोबरच खेळाडूंच्या सरावासाठी देखील स्टेडिअम महत्त्वाची आहेत. या स्टेडिअमवर आयएएस (IAS) अधिकाऱ्यांना संध्याकाळी कुत्रे घेऊन फिरता यावे यासाठी खेळाडूंना बाहेर काढलं जात असल्याचा आरोप खेळाडू आणि प्रशिक्षकांनी केला आहे. नवी दिल्लीत 2010 साली झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या दरम्यान त्यागराज स्टेडिअम बांधण्यात आले आहे. या स्टेडिअमचे नियंत्रण दिल्ली सरकारकडं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या स्टेडिअममध्ये सराव करणारे खेळाडू तसंच त्यांच्या कोचना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्यास भाग पाडलं जात आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे. दिल्ली सरारचे मुख्य महसूल सचिव संजीव खिरवार संध्याकाळी त्यांच्या कुत्र्यांसह स्टेडिअममध्ये फिरतात. त्यामुळे खेळाडूंना नियोजित वेळेच्या आधीच बाहेर काढलं जात असल्याची तक्रार आहे. काय आहे प्रकरण? 'इंडियन एक्स्प्रेस' नं दिलेल्या वृत्तानानुसार त्यागराज स्टेडिअमवरील कोचनी सांगितलं की, 'आम्ही यापूर्वी रात्री 8.30 पर्यंत ट्रेनिंग करत असू. पण, आता आम्हाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मैदान सोडायला सांगितलं जातं. अधिकाऱ्यांना कुत्र्यासोबत मैदानात फिरता यावं यासाठी हे करण्यात येत असून त्यामुळे आमचा सराव आणि दिनचर्या प्राभावित झाली आहे. या प्रकरणात आयएएस अधिकारी संजीव खिरव यांनी हे आरोप फेटाळले आहे. आपण कधी-कधी कुत्र्यासोबत इथं फिरायला येतो,  हे त्यांनी मान्य केलं असलं तरी त्यामुळे सरावात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला आहे. स्टेडिअमचे अधिकारी अजित चौधरी यांनी खेळाडूंच्या सरावाची वेळ संध्याकाळी 4 ते 6 असून 7 वाजेपर्यंत त्यांना सराव करण्यास परवानगी असल्याचा दावा केला. याबाबत त्यांनी कोणताही अधिकृत आदेश दाखवण्यास नकार दिला. या प्रकारचा अधिकृत आदेश इतरांना दाखवणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले. तसंच एखादा सरकारी अधिकारी संध्याकाळी 7 नंतर या सुविधांचा वापर करत असल्याची कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. IPL 2022 : जखमी वाघानं केली लखनऊची शिकार, राहुल कधीही विसरणार नाही जखम या मैदानात सराव करणाऱ्या ज्युनिअर खेळाडूंनी आपण यापूर्वी रात्री 8.30 ते 9 वाजेपर्यंत सराव करत होतो पण आता आमच्याकडं पर्याय नसल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. तर अन्य एका खेळाडूनं आता आपण येथून तीन किलोमीटर दूर असलेल्या जवाहरलाल नेहरू स्टेडिअमवर प्रॅक्टीस करतो कारण ते रात्री 8.30 पर्यंत सुरू असतं असं सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi, Sports

    पुढील बातम्या