मराठी बातम्या /बातम्या /Viral /Vicky Kaushal-Katrina Kaif wedding photo सोबतच व्हायरल होतोय 'या' चहावाल्याचा फोटो; कारण आहे खास

Vicky Kaushal-Katrina Kaif wedding photo सोबतच व्हायरल होतोय 'या' चहावाल्याचा फोटो; कारण आहे खास

Vicky Kaushal-Katrina Kaif wedding : विकी कौशल-कतरीना कैफच्या लग्नानंतर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे हा चहावाला.

Vicky Kaushal-Katrina Kaif wedding : विकी कौशल-कतरीना कैफच्या लग्नानंतर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे हा चहावाला.

Vicky Kaushal-Katrina Kaif wedding : विकी कौशल-कतरीना कैफच्या लग्नानंतर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे हा चहावाला.

मुंबई, 10 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लग्नाच्या बंधनात अडकले (Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding). 9 डिसेंबर, 2021 ला त्यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. पण सोबतच एका चहावाल्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. विकी-कतरिनाच्या लग्नानंतर हा चहावाला चर्चेत आला आहे (Tea Stall related to Salman Khan).

विकी-कतरिनाच्या लग्नाच्या फोटोसोबत या चहावाल्याचा फोटो का व्हायरल होतो आहे, हा चहावाला नेमका कोण आहे आणि त्याचं विकी-कतरिनाच्या लग्नाशी काय संबंध आहे, असे बरेच प्रश्न पडू लागले आहेत. या चहावाल्याचा विकी-कतरिनाच्या लग्नाशी नाही पण कतरिना आणि सलमान खानशी खास कनेक्शन आहे (Salman Katrina Tea Seller Photo Viral).

फोटोत एक चहावाला चहा बनवताना दिसतो आहे. त्याच्या चहाच्या स्टॉलचं नाव आहे सुधीर चायवाला (Sudhir Chaiwala).

हे वाचा - हा PHOTO पाहून IFS अधिकाऱ्याला आठवला एक अभिनेता; तुम्ही सांगू शकाल का तो कोण?

या फोटोकडे तुम्ही नीट पाहाल तर या फोटोत असं काही दिसतं आहे, जिथं प्रत्येकाची नजर जाते आहे. या स्टॉलवर एक बोर्ड आहे. ज्यावर लिहिलं आहे की, सलमान खानने कतरिनाच्या कानात सांगितलं, चल सुधीरच्या दुकानात चहा पिऊया. हेच कारण आहे ज्यामुळे हा फोटो व्हायरल होतो आहे. हा फोटो शेअर करून लोक सलमान खानची खिल्लीही उडवत आहे.

हिंदुस्थान वेबसाईटच्या रिपोर्टनुसार व्हायरल होणाऱ्या फोटोतील चहा स्टॉल हा बिहारच्या पाटणातील  (Patna Tea Stall Photo) आहे. कुंवर सिंह चौकात हा टी स्टॉल आहे. हा फोटो यावर्षी ऑगस्टमध्येसुद्धा व्हायरल झाला होता. त्यावेळी कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा नव्हती. सलमान आणि कतरिनाचा संबंध जोडला जात होता.

हे वाचा - या PHOTOS मध्ये तुम्ही कतरिनाची एंगेजमेंट रिंग नोटीस केली का? इतकी आहे किंमत

सलमान आणि कतरिना यांनी बऱ्याच फिल्ममध्ये एकत्र काम केलं आहे. त्याच्या लव्ह स्टोरीचीही चर्चा होती. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडत होती.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Katrina kaif, Salman khan, Vicky kaushal, Viral, Viral photo