मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding: या सुंदर PHOTOS मध्ये तुम्ही कतरिनाची ब्लू-डायमंड एंगेजमेंट रिंग नोटीस केली का? इतकी आहे किंमत

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding: या सुंदर PHOTOS मध्ये तुम्ही कतरिनाची ब्लू-डायमंड एंगेजमेंट रिंग नोटीस केली का? इतकी आहे किंमत

गेल्या काही आठवड्यांपासून बीटाउनमध्ये ज्या गोष्टीची चर्चा सुरू होती, अखेर तो क्षण 9 डिसेंबर रोजी पार पडला. बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड लग्न गुरुवारी राजस्थानमध्ये पार पडलं. गुरुवारी अखेर कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नबेडीत (Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding) अडकले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 10 डिसेंबर: गेल्या काही आठवड्यांपासून बीटाउनमध्ये ज्या गोष्टीची चर्चा सुरू होती, अखेर तो क्षण 9 डिसेंबर रोजी पार पडला. बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड लग्न गुरुवारी राजस्थानमध्ये पार पडलं. गुरुवारी अखेर कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नबेडीत (Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding) अडकले. यानंतर समोर आलेले फोटो चाहत्यांच्या (Katrina Kaif- Vicky Kaushal Latest Photos) पसंतीस उतरत आहेत. अद्याप बॉलिवूडच्या (Vickat Wedding) या नव्या कपलचे केवळ 5-6 फोटोजच समोर आले आहेत. मात्र त्यांनी कोणत्या ब्रँडचे कपडे घातले आहेत, ज्वेलरी काय काय आहे याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. कतरिना तिच्या लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये एखाद्या राजकुमारीसारखीच वाटत आहे, तर विकीचा लुकही राजबिंडा आहे. दरम्यान या सर्व फोटोमध्ये लक्ष वेधलं आहे ते म्हणजे कतरिनाच्या साखरपुड्याच्या अंगठीने! कतरिनाच्या हातातील ब्लू-डायमंड एंगेजमेंट रिंग (Katrina Kaif Blue Diamond Ring) सर्वांनीच नोटीस केली आहे.

हे वाचा-कतरिना-विकिच्या लग्नाची क्रेझ, मिनिटात फोटोंना मिळाल्या 15 लाख लाईक्स

काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकीच्या एंगेजमेंटच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र तिने त्यावेळी याबाबत नकार दिला होता. मात्र आता नववधूचा साज परिधान केलेली कतरिना हातामध्ये एंगेजमेंट रिंग फ्लाँट करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिना फारच गोड 'नवराई' दिसत आहे. तिच्या हातातील मेहंदीला चुडा आणि अंगठीने 'चार चाँद' लावले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती हातात ब्लू-डायमंड प्लॅटिनम एंगेजमेंट रिंग फ्लाँट करता दिसते आहे. चारी बाजूंनी हिरे असलेल्या या रिंगमध्ये मध्यभागी टिफनी सॉलिटेअर देखील आहे. या टिफनी सॉलिटेअर एंगेजमेंट रिंगची किंमत सुमारे 7 ते 8 लाख रुपये आहे. विकी कौशलची एंगेजमेंट रिंग देखील प्लॅटिनमची आहे. मात्र, त्यात हिरा नाही. बीटाऊनमध्ये झालेल्या या लग्नापैकी हे सर्वाधिक चर्चा झालेलं लग्न आहे.

हे वाचा-PHOTOS : केसात गजरा हातात चुडा मिसेस कौशलचा First look

कतरिना-विकीची बिग फॅट वेडिंग अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे सात फेरे घेऊन दोघांनी आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला. मीडिया अहवालानुसार, आज राजस्थानमधून कतरिना आणि विकी मुंबईसाठी रवाना होत आहेत आणि तिथूनच थेट हनिमूनसाठी जाण्याची त्यांची योजना आहे.

First published:

Tags: Katrina kaif, Vicky kaushal