जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हा PHOTO पाहून IFS अधिकाऱ्याला आठवला एक अभिनेता; तुम्ही सांगू शकाल का तो कोण?

हा PHOTO पाहून IFS अधिकाऱ्याला आठवला एक अभिनेता; तुम्ही सांगू शकाल का तो कोण?

हा PHOTO पाहून IFS अधिकाऱ्याला आठवला एक अभिनेता; तुम्ही सांगू शकाल का तो कोण?

हा पक्षी ज्या स्थितीत उभा राहिला आहे तो पाहून तुम्हाला कुणाची आठवण झाली?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social media) बरेच फोटो (Viral photo), व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. ज्यात काही शॉकिंग, काही इमोशनल, काही फनी असतात. काही फोटो, व्हिडीओ तर असे असतात जे बरंच काही सांगून जातात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका पक्ष्याचा हा फोटो आहे. जो पाहून बहुतेकांना एका अभिनेत्याची आठवण झाली आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान आपल्या ट्विटर अकाऊंटर प्राणी-पक्ष्यांचे काही फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका पक्ष्याचा फोटो असलेली पोस्ट रिट्विट केली आहे. या पक्ष्याला पाहून त्यांना एका अभिनेत्याची आठवण झाली आहे. फक्त त्यांनाच नाही तर सोशल मीडियावर ज्यांनी ज्यांनी हा फोटो पाहिला त्यापैकी बहुतेकांनी हा फोटो पाहताच तोच अभिनेता आठवला. तुम्हीही हा फोटो नीट पाहा आणि तुम्हाला नेमका कोणता अभिनेता दिसतो आहे ते पाहा. हे वाचा -  Video : आलियाला विचारलं ‘R’ तुझ्यासाठी लकी आहे का? लाजून दिलं उत्तर.. फोटो नीट पाहिला तर हा पक्षी दोन फुलांच्या मधोमध उभा आहे. त्याने आपले दोन्ही पाय या दोन फुलांवर ठेवले आहेत. हा पक्षी ज्या स्थितीत उभा राहिला आहे तो पाहून तुम्हाला कुणाची आठवण झाली. काय आठवला का तो अभिनेता, ती फिल्म आणि तो सीन. परवीन कासवान आणि इतर नेटिझन्सना यांना या पक्ष्याला पाहून आठवला तो अजय देवगण.

जाहिरात

अजय देवगनची पहिली फिल्म ‘फूल और कांटे’ मधील हा सीन. दोन बाईकच्या मधोमध राहून धांसू एंट्री मारणारा अजय देवगण आजही सर्वांच्या लक्षात आहे. हे वाचा -  जमिनीवर झोपून तरुण करत होता फोटोशूट; समोरून सिंह आले आणि…; Shocking video अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांची ही आयडिया होती. या सीनसाठी कोणतंही स्पेशल ग्राफिक्सची मदत घेतली नव्हती. तर भरपूर मेहनतीने हा सीन प्रत्यक्षात करण्यात आला होता.

या फिल्ममध्ये ती स्टंट कोऑर्डिनेटर होते. वीरू देवगन स्वतः अभिनेता बनले नाहीत पण आपला मुलगा हिरो बनवा असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे डेब्यू फिल्ममध्ये अजयची एंट्री कायम सर्वांच्या लक्षात राहावा यासाठी त्यांचा प्रयत्न होता आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात