श्रीनगर, 14 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून सर्वांशी संवाद साधला आहे. अगदी लहान मुलांशीही त्यांनी संवाद साधलेला आहे. काही लहान मुलांनाही आपलं मन त्यांच्याकडे मोकळं केलं आहे. पत्र किंवा इतर माध्यमातून आपल्या मागण्या काही चिमुकल्यांनी मोदींपर्यंत पोहोचवल्या आहेत. आता आणखी एका अशाच चिमुकलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जिने पंतप्रधान मोदींसमोर आपली व्यथा मांडली आहे. किंबहुना तिने आपलं भयाण वास्तवच पंतप्रधानांना दाखवलं आहे. जम्मू-काश्मीरमधील एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत मुलीने दिलेल्या माहितीनुसार तिचं नाव सीरत नाज आहे. ती जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार गावची रहिवासी आहे .ती लोहाई इथल्या सरकारी हायस्कूलमध्ये शिकते. तिने आपला एक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती म्हणते, नमस्कार मोदीजी, तुम्ही सर्वांचं ऐकता. आज कृपया माझंही ऐका. असं म्हणत ती पुढे आपली शाळा दाखवताना दिसते आहे.
मुलगी आपल्या शाळेत जाते. व्हिडीओत ती आपली संपूर्ण शाळा दाखवते. AI PHOTO - भारत-पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर…; शोधूनही पाहायला मिळणार नाही असं अद्भुत दृश्य शाळेत जाताच समोर ती मुख्याध्यापकांचं कार्यालय आणि स्टाफ रूम दाखवते. त्यासमोर असलेल्या खुल्या जागेतच ती आपण बसत असल्याचं सांगते. जिथं ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शिकण्यासाठी बसते ती फरशी खूप अस्वच्छ आहे. गलिच्छ आणि तुटलेले टॉयलेट दाखवते. यामुळे आपल्याला उघड्यावर शौच करावं लागत असल्याचं ती म्हणते. एक नाली दाखवते आणि इथं आपण शौचाला जातो असं सांगते. शाळेची नवी इमारतही ती दाखवते, जी गेल्या पाच वर्षांपासून बनते आहे. तिची अवस्थाही बिकट आहे. VIDEO - अजब प्रकरण! श्वानाने मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप; पोलिसात तक्रार, अटकेची मागणी एकंदर आपल्या शाळेचं भयाण वास्वत या चिमुकलीने मोदींसमोर आणलं आहे आणि त्यांना कळकळीची विनंतीही केली आहे. तुम्ही आमच्यासाठी चांगली शाळा बनवा अशी मागणी ती पंतप्रधानांकडे करते.
आता पंतप्रधान मोदी या चिमुकलीची विनंती, मागणी ऐकणार का? ते चिमुकलीची इच्छा पूर्ण करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.