नवी दिल्ली 30 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ अत्यंत मजेशीर असतात आणि खळखळून हसायला भाग पाडतात, तर काही व्हिडिओ इतके इमोशनल असतात की ते पाहूनच डोळ्यात अश्रू येतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि यात दिसणाऱ्या व्यक्तीचा धाडसाला आणि कार्याला सलाम कराल. VIDEO: मुसळधार पावसात वाहत होता रक्ताचा पाट; तरुणांनी तलवारीने केले सपासप वार सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक धाडसी व्यक्ती पुरात (Flood) अडकलेल्या 3 युवकांना वाचवण्यासाठी वाहत्या पाण्यात उडी घेतो. ट्विटमध्ये (Tweet) सांगितलं गेलं आहे, की ही घटना काश्मीरच्या (Kashmir) गांदरबल येथील आहे. इथे सिंध नदीला आलेल्या पुरात 3 युवक अडकले होते. या तिघांना वाचवण्यासाठी बशीर मीर नावाच्या एका व्यक्तीनं वाहत्या पाण्यात उडी घेतली. यादरम्यान बशीर आपल्या जीवाची पर्वा न करता या तिघांचा जीव वाचवतात आणि त्यांना सुखरूप बाहेर काढतात. ट्विटरवर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात बशीरचं धाडस पाहायला मिळतं. नदीमध्ये पाण्याचा वेग इतका अधिक आहे की यात कोणीही वाहून जाऊ शकेल. मात्र, तरीही बशीर या पाण्यात उतरतात आणि या तीन युवकांपर्यंत पोहोचतात. या तिघांमधील एक युवक चांगल्या प्रकारे पोहणारा आहे. मात्र, पाण्याची पातळी पाहून तो घाबरला. मात्र, बशीर यांनी न घाबरता तिघांची सुटका केली.
Bashir Mir of Kangan has saved hundred of lives. Brave man Jumped into River Sindh in Ganderbal District and Saved three boys who were trapped in flood. Proud of you 🙏 #brave #BashirMir sb. pic.twitter.com/W0s7OF4DXV
— Irfan Ahmad (@IrfanAhmad__) July 29, 2021
अरे या नवरीला आवरा! लग्नातच असं काही केलं की नवऱ्याला फुटला घाम; पाहा Video सोशल मीडियावर बशीरच्या धाडसाचा हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. लोक बशीर यांच्या या कामाला सलाम करत आहेत.. 42 वर्षीय बशीर अहमद मीर यांचं घर काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील कंगन येथे आहे. ते केवळ सिंधूच नाही तर झेलम, डल झील यासह अनेक नद्यांमध्ये बुडणाऱ्या लोकांना वाचवतात. इतकंच नाही तर त्यांनी पोलीस आणि एनडीआरएफची टीमही बचावकार्यावेळी सोबत ठेवते.