मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे या नवरीला आवरा! लग्नातच असं काही केलं की नवऱ्याला फुटला घाम; पाहा Wedding Video

अरे या नवरीला आवरा! लग्नातच असं काही केलं की नवऱ्याला फुटला घाम; पाहा Wedding Video

लग्नमंडपातच नवरीने घातला धिंगाणा.

लग्नमंडपातच नवरीने घातला धिंगाणा.

लग्नमंडपातच नवरीने घातला धिंगाणा.

मुंबई, 29 जुलै : तसं लग्न (Wedding video) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. पण त्यातही काही क्षण असे असतात जे नवरानवरीसाठी (Bride groom video) खूपच खास असतात. अशाच क्षणांपैकी एक म्हणजे एकमेकांना वरमाला (Wedding Jaymala video) घालणं. त्यामुळे हा खास क्षण कायम लक्षात रहावा असं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतोच. पण एका नवरीने मात्र यापलीकडे जाऊन हा खास क्षण फक्त खास नाही तर अधिकच खास बनवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या या प्रयत्नामुळे नवरदेवाची मात्र चांगलीच दमछाक झाली.

वरमाला घालताना स्टेजवर वधूने धिंगाणाच (Wedding funny video) घातला आहे. नवरीने वरमाला घालताना असं काही केलं की नवरदेवाला घामच फुटला. लग्नातच नवरीने नवर्‍याला चांगलंच नाचवलं आहे (Bride running in wedding).

सुरुवातीला वरमाला घालताना नवरानवरीला वर उचललं जायचं. आता तर नवरानवरी आपल्या गुडघ्यावर बसून आपल्या जोडीदारासमोर डोकं झुकवून वरमाला घालून घेतात. पण या नवरीने तर त्याच्यापुढेही जाऊन काय केलं ते तुम्हीच पाहा.

हे वाचा - थरथर कापू लागला, घाम फुटला, रडूही कोसळलं! नवरा-नवरीच्या मध्ये येताच बिथरला तरुण

व्हिडिओत पाहू शकता, नवरानवरी वरमाला घालण्यासाठी समोरासमोर उभे आहेत. सर्वात आधी नवरी नवर्‍याला वरमाला घालते. तेव्हा ती एकदम शांत आहे. पण जेव्हा नवरा तिला वरमाला घालायला जातो तेव्हा ती आपलं खरं रूप दाखवते.  नवरा वरमाला घालायला जाताच वधू आधी थोडी मागे होते. बस्स इतके नखरे केल्यानंतर ती वरमाला घालायला देईल असं वाटतं. पण नवरी तर नवर्‍याला पासून दूरच पळते. ती पळते आणि बिचारा नवरा हातात वरमाला घेऊन तिच्या मागेमागे पळतो. नवर्‍याला नवरी मंडपभर फिरवते. ती त्याला इतकं पळवते इतकं पळवते की त्याला अक्षरशः घामच फुटतो. पण नवरी काही ऐकत नाही. तिचा धिंगाणा सुरूच असतो.

हे वाचा - नवरी जोमात नवरदेव कोमात! लाजणं दूर नववधूने मंडपातच ऐटीत तोंडातून सोडला धूर

Rofl_Baba ट्विटर युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कोणी तरी हिला थांबवा असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर या नवरीला कुणीतरी आवरा अशीच प्रतिक्रिया तुमचीही असेल. व्हिडीओ पाहून त्यावर अशा बर्‍याच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:
top videos

    Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video