मराठी बातम्या /बातम्या /Viral /Danger पठ्ठ्या..! दोन वर्षांचा हा चिमुरडा दररोज ओढायचा 40 सिगारेट, पण आता...

Danger पठ्ठ्या..! दोन वर्षांचा हा चिमुरडा दररोज ओढायचा 40 सिगारेट, पण आता...

तुम्ही कधी 2 वर्षांच्या मुलाला सिगारेट ओढताना पाहिलं आहे (Have you seen 2 year old kid smoking) का ? पाहणं तर सोडाच, कदाचित तुम्ही हे कधी ऐकलंही नसेल.

तुम्ही कधी 2 वर्षांच्या मुलाला सिगारेट ओढताना पाहिलं आहे (Have you seen 2 year old kid smoking) का ? पाहणं तर सोडाच, कदाचित तुम्ही हे कधी ऐकलंही नसेल.

तुम्ही कधी 2 वर्षांच्या मुलाला सिगारेट ओढताना पाहिलं आहे (Have you seen 2 year old kid smoking) का ? पाहणं तर सोडाच, कदाचित तुम्ही हे कधी ऐकलंही नसेल.

जकार्ता, 27 डिसेंबर:धूम्रपान ( smoking ) आरोग्यासाठी ( health ) घातक असतं, हे जवळपास सर्वच जणांना माहिती आहे. सिगारेटच्या ( Cigarette ) पाकिटावर तशी सूचनाही दिलेली असते. एखाद्या व्यक्तीला सिगारेट ओढण्याचं व्यसन असेल, तर अनेकजण त्याला ते सोडण्यास सांगतात. लहान मुलांना तर तंबाखूजन्य पदार्थांचं ( addicted to tobacco ) व्यसन लागू नये, यासाठी बरीच काळजी घेतली जाते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, दोन वर्षांचा एक मुलगा दिवसाला तब्बल 40 सिगारेट ओढत होता. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे.

तुम्ही कधी 2 वर्षांच्या मुलाला सिगारेट ओढताना पाहिलं आहे (Have you seen 2 year old kid smoking) का ? पाहणं तर सोडाच, कदाचित तुम्ही हे कधी ऐकलंही नसेल. सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकदा अशी छायाचित्रे आणि बातम्या व्हायरल होत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं सोपं नसतं. पण बऱ्याचवेळा अशा व्हायरल होणाऱ्या बातम्या 100 टक्के खऱ्या असतात.

हेही वाचा- Kitchen Hacks: मऊ आणि टम्म फुगणाऱ्या पोळ्या बनवता येत नाहीत; मग या सोप्या टिप्स फॉलो करा

सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा मुलगा केवळ धूम्रपान करत नव्हता, तर एखाद्या दिवशी तो अनवधानाने दोन ते चार पाकिटं म्हणजेच 40 सिगारेट ओढत असे. काही वर्षांपूर्वी अचानक प्रसिद्ध झालेल्या इंडोनेशियातील अर्दी रिझाल(Ardi Rizal) या 2 वर्षांच्या मुलाची ही गोष्ट आहे. सुरुवातीला या मुलाचे धुम्रपान करतानाचे फोटो पाहूनही लोकांचा विश्वास बसला नाही. त्याचे फोटो सॉफ्टवेअरद्वारे एडिट केले गेले असावेत, असं अनेकजण म्हणायचे. पण प्रत्यक्षात ही बातमी 100 टक्के खरी होती. कारण हा लहान मुलगा मोठा झाल्यानंतर त्याने स्वतःहून तसं स्पष्ट केलं होतं.

इंडोनेशिया सरकारने घेतली होती दखल

2010 च्या सुमारास या दोन वर्षांच्या मुलाचा सिगारेट ओढतानाचा व्हिडीओ आणि बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. इंडोनेशियाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेत मुलाला सिगारेट सोडण्यास मदत केली. दिवसाला 40 सिगारेट्स सहज ओढणाऱ्या या इंडोनेशियाच्या अर्दीचे सिगारेट सोडण्याचे व्यसन सुटावं, याची जबाबदारी इंडोनेशियाच्या प्रशासनाने घेतली. 2013 मध्ये, अर्दीची आई डायन यांनी सांगितले की, 'जेव्हा त्याने सुरुवातीला धूम्रपान सोडलं, तेव्हा तो खेळणी खरेदी करण्याचा हट्ट धरायचा. जर त्याला खेळणी दिली नाही, तर तो त्याचे डोके आपटून स्वतःला दुखापत करून घ्यायचा. हळूहळू त्याची सवय सुटली आणि आता त्याने सिगारेट पूर्णपणे सोडली आहे.'

हेही वाचा-  नराधम पुत्र! अगोदर काढला वडिलांचा विमा, पैसे मिळवण्यासाठी केला खून; असं फुटलं बिंग 

4 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये विदेशी पत्रकारांनी आर्दीचा शेवटचा फोटो काढला होता. त्यामध्ये तो पूर्णपणे बदललेला दिसत होता. सध्या त्याचा कोणताही लेटेस्ट फोटो नाही, तरी सिगारेट सोडल्यानंतर काही वर्षांनंतर काढलेल्या फोटोमध्ये तो अगदी निरोगी दिसत होते.

असे लागले व्यसन

'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आई-वडिलांच्या निष्काळजीपणामुळे अर्दीला व्यसन लागले होते. तो 18 महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांनी गंमतीने त्याला सिगारेट ओढायला दिली. वडिलांनी असे बरेचदा केले, आणि हळूहळू मुलाला सिगारेटची त्याला सवय झाली. सिगारेट ओढण्याची त्याची सवय सुटल्यावर त्याचे डोके जड होऊ लागले आणि तो चिडचिड करू लागला. सिगारेट सोडताच त्याची भूक वाढली. तो अधिक फास्ट फूड खाऊ लागला. त्यामुळे त्याचे वजन वाढले होते. वयाच्या 5 व्या वर्षी त्याचे वजन 22 किलो झाले होतं.

हेही वाचा- सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टी खाल तर दिवसभर वैतागून जाल; जाणून घ्या अशा पदार्थांविषयी

सिगारेट ओढण्यास सराईत असलेल्या एखाद्या प्रौढाप्रमाणे एकामागून एक सिगारेट ओढणारा अर्दीची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर इंडोनेशियाचे प्रशासन जागे झाले होते. आपल्या देशातही काही मुले व्यसनाच्या आहारी जाताना दिसतात. वेळीच त्यांना व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

First published:

Tags: Cigarette, Health, Smoking