मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नराधम पुत्र! अगोदर काढला वडिलांचा विमा, पैसे मिळवण्यासाठी केला खून; असं फुटलं बिंग

नराधम पुत्र! अगोदर काढला वडिलांचा विमा, पैसे मिळवण्यासाठी केला खून; असं फुटलं बिंग

झटपट पैसे मिळून श्रीमंत होण्यासाठी मुलानेच वडिलांच्या हत्येचा कट रचला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलाचा गुन्हा उघड झाला.

झटपट पैसे मिळून श्रीमंत होण्यासाठी मुलानेच वडिलांच्या हत्येचा कट रचला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलाचा गुन्हा उघड झाला.

झटपट पैसे मिळून श्रीमंत होण्यासाठी मुलानेच वडिलांच्या हत्येचा कट रचला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलाचा गुन्हा उघड झाला.

जयपूर, 27 डिसेंबर: आपल्या वडिलांचा (Father) अपघाती विमा (Accidental Insurance) काढून त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या (Brutal Murder) करणाऱ्या नराधम तरुणाला पोलिसांनी अटक (Police arrested) केली आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी (To get money) त्याने वडिलांचा खून करण्याची योजना आखली. अगोदर वडिलांचा विमा काढला आणि नंतर त्यांना ठार करत विम्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला.

असा आखला डाव

राजस्थानमधील भरतपूरमध्ये राजेश नावाचा तरुण त्याचे वडील मोहकमसोबत राहत असे. चार महिन्यांपूर्वी त्याने वडिलांचा विमा उतरवला होता. शहरातील वेगवेगळ्या चार ठिकाणी त्याने वडिलांचा अपघात विमा काढला होता. त्या विम्याच्या आधारे आपण पूर्ण आय़ुष्य काढू शकू, असं त्याला वाटत होतं. त्यासाठी वडिलांना ठार करून अपघात झाल्याचं भासवण्याचा डाव त्याने रचला. 

असा केला खून

राजेशनं या कामासाठी त्याच्या दोन मित्रांची मदत घेतली. आपल्या वडिलांना घेऊन गावी जाण्याचा प्लॅन त्याने रचला आणि मित्रांसोबत वडिलांना गावी जाण्यास सांगितलं. वडील त्यासाठी तयार झाले आणि राजेशच्या दोन मित्रांसह गाडीत बसून ते गावी जाण्यास निघाले. निघण्यापूर्वी राजेशने त्याच्या मित्रांना दारू पाजली आणि त्यांच्याकडे हातोडा दिला. गाडी वाटेत थांबवून त्यांनी वडिलांच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्यांचा खून केला आणि मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. वडिलांचा अपघात झाला आहे, असं वाटावं आणि त्यांच्या अपघाती विम्याची रक्कम लाटता यावी, हा त्यामागचा उद्देश होता.

दारु पिऊन चालवली गाडी

वडिलांचा यशस्वीरित्या खून केल्याच्या पाशवी आनंदात राजेश आणि त्याच्या मित्रांनी भरपूर दारू प्यायली आणि रस्त्याने धिंगाणा करत गाडी चालवू लागले. ते पाहून पोलिसांनी त्यांना रोखलं आणि जाब विचारला. त्यांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरण्याबाबत कुठलंही समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.

हे वाचा -

असा झाला उलगडा

दुसऱ्या दिवशी मोहकम यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विमा उतरवण्यात आल्याचं पोलिसांना समजलं. मोहकम यांचा मुलगाही त्याच रस्त्यावर दारूच्या नशेत फिरत असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांना संशय वाढला. त्यांनी राजेशकडे पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Father, Murder