मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टी खाल तर दिवसभर वैतागून जाल; जाणून घ्या अशा पदार्थांविषयी

सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टी खाल तर दिवसभर वैतागून जाल; जाणून घ्या अशा पदार्थांविषयी

आपण रिकाम्या पोटी असतो तेव्हा आपल्या आतड्यातील असंख्य जीवाणू असे विशिष्ट रसायन तयार करतात, ज्यामुळे रिकाम्या पोटी अ‌ॅसिड अ‌ॅक्टिव होत नाही. काही पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने असे जीवाणू मरतात. यासाठी आपण रिकाम्या पोटी काय खाऊ नये, हे जाणून (Avoid these foods in empty stomach) घेणे महत्त्वाचे आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : आपण जे खातो त्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. यासाठी योग्य आहार योग्य वेळी घेणे खूप महत्त्वाचे असते. आपल्या रोजच्या आहारात असे काही पदार्थ असतात, जे योग्य वेळी सेवन न केल्यास फायद्याऐवजी नुकसानकारक ठरू शकतात. काही पदार्थ तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी (empty stomach) खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. वास्तविक, आपण रिकाम्या पोटी असतो तेव्हा आपल्या आतड्यातील असंख्य जीवाणू असे विशिष्ट रसायन तयार करतात, ज्यामुळे रिकाम्या पोटी अ‌ॅसिड अ‌ॅक्टिव होत नाही. काही पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने असे जीवाणू मरतात. यासाठी आपण रिकाम्या पोटी काय खाऊ नये, हे जाणून (Avoid these foods in empty stomach) घेणे महत्त्वाचे आहे.

ताक

Guardian.ng वेबसाईटच्या माहितीनुसार, अनेक लोक रिकाम्या पोटी ताक पिणे योग्य मानतात, परंतु असे करणे त्रासदायक ठरू शकते. ताकामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. लॅक्टिक अॅसिड रिकाम्या पोटात जाऊन अनेक चांगले बॅक्टेरिया मारून टाकते. हे बॅक्टेरिया पोटात आम्लता निर्माण होण्यापासून रोखण्यास मदत करणारे असतात. त्यामुळे रिकाम्या पोटी ताक प्यायल्यास अॅसिडिटी वाढू शकते.

साखर

सामान्यतः लोक रिकाम्या पोटी सरबत पिणे योग्य मानतात. परंतु, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की सकाळी साखर पचण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी साखरेचे सेवन करू नये.

हे वाचा - Coriander leave : थंडीत कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोथिंबीर आहे फायदेशीर; जाणून घ्या सर्व फायदे

कार्बोनेटेड पेय

शीतपेयांचे सेवन करणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले नसते. सकाळी रिकाम्या पोटी शीतपेय किंवा सोडा पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे पोटात अ‌ॅसिडिटी होऊ शकते. याशिवाय रिकाम्या पोटी शीतपेय प्यायल्यास पोट फुगण्याची समस्या देखील होऊ शकते. याशिवाय अन्ननलिकेमध्ये कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो.

लिंबूवर्गीय फळे

संत्री आणि लिंबू देखील सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. त्याचाही कार्बोनेटेड पदार्थासारखाच प्रभाव असतो. या गोष्टींमुळे गॅस वाढवणारी रसायने तयार होतात. त्यामुळे अॅसिडिटी वाढते. तथापि, त्यांच्यामध्ये असलेले अनेक अँटिऑक्सिडंट्स आपल्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात.

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

गरम मसाला

रिकाम्या पोटी किंवा सकाळी लवकर भरपूर गरम मसाला घातलेले पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते. यामुळे छातीत जळजळ देखील होऊ शकते. रिकाम्या पोटी गरम मसाला खाल्ल्याने गॅसेसचा त्रास वाढतो, ज्यामुळे पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips