मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Kitchen Hacks: मऊ आणि टम्म फुगणाऱ्या पोळ्या बनवता येत नाहीत; मग या सोप्या टिप्स फॉलो करा

Kitchen Hacks: मऊ आणि टम्म फुगणाऱ्या पोळ्या बनवता येत नाहीत; मग या सोप्या टिप्स फॉलो करा

How To Make Soft And Fluffy Rotis Follow These Easy Tips : पोळी, रोटी, भाकरी, पराठा, नान हे प्रकार बनवणं फार कठीण काम नाही. मात्र, प्रत्येकाला ते जमतातच असं नाही. जर तुम्हालाही हे पदार्थ बनवणं कठीण जात असेल तर या टिप्स तुमचं काम सोपं करतील.

How To Make Soft And Fluffy Rotis Follow These Easy Tips : पोळी, रोटी, भाकरी, पराठा, नान हे प्रकार बनवणं फार कठीण काम नाही. मात्र, प्रत्येकाला ते जमतातच असं नाही. जर तुम्हालाही हे पदार्थ बनवणं कठीण जात असेल तर या टिप्स तुमचं काम सोपं करतील.

How To Make Soft And Fluffy Rotis Follow These Easy Tips : पोळी, रोटी, भाकरी, पराठा, नान हे प्रकार बनवणं फार कठीण काम नाही. मात्र, प्रत्येकाला ते जमतातच असं नाही. जर तुम्हालाही हे पदार्थ बनवणं कठीण जात असेल तर या टिप्स तुमचं काम सोपं करतील.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 डिसेंबर : मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगणाऱ्या पोळ्या बनवणं हा भारतीय स्वयंपाकातील एक अवघड समजला जाणारा प्रकार आहे. पोळी, रोटी, भाकरी, पराठा, नान हे प्रकार बनवणं फार कठीण काम नाही. मात्र, प्रत्येकाला ते जमतातच असं नाही. जर तुम्हालाही हे पदार्थ बनवणं कठीण जात असेल तर या टिप्स तुमचं काम सोपं करतील. परफेक्ट पोळी बनवण्यासाठी पीठ योग्य प्रमाणात बारीक असणं आणि ताजं असणं सर्वांत महत्त्वाचं आहे. यासह आणखी काही बाबी लक्षात ठेवल्या तर तुम्ही उत्तम (How To Make Soft And Fluffy Rotis Follow These Easy Tips) रोटी बनवू शकाल. चला जाणून घेऊ त्याविषयी.

1. अशा प्रकारे पीठ मळून घ्या

जेव्हा तुम्ही पीठ मळून घ्याल, तेव्हा मळलेलं पीठ मऊ असणं महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. थोड्या घट्ट भिजवलेल्या पिठाच्या पोळ्या बनवायला सोप्या असतात. पण त्यापासून चांगल्या पोळ्या बनत नाहीत. मऊ पोळी बनवण्यासाठी पीठ खूप वेळ आणि नरम मळून घ्या.

2.पीठ मळल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवा

पीठ मळून झाल्यावर मळलेल्या गोळा हलक्या हातांनी किंचितसा ओलसर करा किंवा त्याला तेल लावून घ्या आणि 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा. यानंतर पीठ पुन्हा चांगलं मळून घ्या. नंतर पोळ्या बनवा.

3. पीठ मळताना आणि पोळ्या भाजताना खाद्यतेल वापरा

पीठ मळताना ते मऊ करण्यासाठी पिठात थोडं तेल वापरावं. शिवाय, पोळी तव्यावर भाजतानाही थोडं शेकून झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी तेल लावावं. यामुळं पोळ्या तयार केल्यानंतर बराच वेळ मऊसूत राहतात.

4.मऊ हात

पोळी बनवताना ती नीट लाटणं फार महत्त्वाचं आहे. कणकेचा छोटा गोळा करून हलक्या हातांनी लाटून घ्यावा. प्रथम कडा लाटून घ्याव्यात. संपूर्ण पोळी समान जाडीची लाटावी. गोलाकार देण्याच्या नादात एका ठिकाणी जाड आणि एका ठिकाणी पातळ लाटू नये. यामुळं पोळ्या फुगत नाहीत.

5. लाटताना कमीत कमी पीठ लावावं

घाईगडबडीत पोळी लाटताना अनेकजण जास्त प्रमाणात कोरडं पीठ वापरतात. त्यामुळं पोळ्या लाटणं सोपं जातं. मात्र, त्यामुळं पोळ्यांचा ओलावा निघून जातो आणि त्या लगेचच कोरड्या आणि कडक होतात.

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

6. तवा आधीपासून गरम करा

पोळी भाजण्यासाठी तव्यावर टाकण्यापूर्वी आधीच तवा गरम करून घ्या. तसंच तव्याची उष्णता संतुलित ठेवावी. खूप गरम तव्यावर पोळ्या करपतात आणि कमी उष्णतेवर त्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. कच्च्या राहतात. तसंच, कमी उष्णतेवर अधिक काळ पोळ्या तव्यावर राहिल्यास त्या कडक आणि नंतर चिवट होतात.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

7. तूप लावून झाकणबंद भांड्यात ठेवा

तुमच्या पोळ्या मऊ राहत नसतील तर तव्यातून काढल्याबरोबर त्यांना तूप लावून झाकणबंद भांड्यात ठेवा. मात्र, गरमागरम पोळ्या ताटात वाढणं किंवा खायला घेणं केव्हाही चांगलं.

First published:

Tags: Lifestyle, Technics