मराठी बातम्या /बातम्या /Viral /Indian Railway : रेल्वे स्टेशनचं नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिलं जातं?

Indian Railway : रेल्वे स्टेशनचं नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिलं जातं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Indian Railway Interesting news : पिवळ्या रंगाच्या बोर्डवर स्टेशनचे नाव का लिहिले जाते?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 10 जानेवारी : आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी रेल्वेनं प्रवास केलाच असेल. हा प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा आणि वेळेत पोहोचवणारा असतो. म्हणून तर सर्वसामान्यांपासून ते अगदी श्रीमंत व्यक्तींपर्यंत जवळ-जवळ सर्वच जण लांबच्या प्रवासासाठी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे देखील आपल्या प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा घेऊन येत असते.

रेल्वेनं तुम्ही अनेक वेळा प्रवास केला असला तरी देखील. रेल्वेशी संबंधीत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहित नसतात किंवा त्यामागील कारण आपल्याला माहित नसते.

हे ही वाचा : एक फोनकॉल असा ही, फोनवर बोलत राहिली महिला आणि स्वत:लाच घातला गंडा

तुम्ही पाहिलं असेल की स्टेशनवर सफेद रंगाच्या पाटीवर स्टेशनचं नाव लिहिलेलं असतं. पण स्टेशनच्या सुरुवातीला असलेला बोर्ड हा नेहमी पिवळ्या रंगाचा असतो, ज्यावर काळ्या रंगाने स्टेशनचं नाव लिहिलं जातं. पण मग असं का? स्टेशनचं नाव लिहिलेला हा बोर्ड पिवळ्या रंगाचा का असतो? याबद्दल कधी विचार केलाय? यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. ते कारण काय चला जाणून घेऊ.

पिवळ्या रंगाच्या बोर्डवर स्टेशनचे नाव का लिहिले जाते?

पिवळा रंग हा अशा भडक रंगांपैकी एक रंग आहे. जो कोणालाही लांबून सुद्ध दिसू शकतो. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहिलेले रेल्वे स्टेशनचे नाव लोको पायलटला लांबुनच दिसते आणि त्यानुसार तो ट्रेनची स्पीड कमी-जास्त करतो किंवा स्टेशनवर थांबतो.

पिवळ्या रंगामुळे लोको पायलटना अंतराचा अंदाज येउन त्यांना रेल्वेचा वेग कमी करण्यास मदत मिळते. तसेच रात्रीच्या वेळीदेखील अंधारातही हा पिवळा रंग स्पष्ट दिसतो. त्यामुळेच रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर लिहिले जाते.

मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की, पिवळा रंग सहज का दिसतो?

आपल्याला हे माहित आहे की लाल रंग हा देखील महत्वाचा आणि भडक रंग आहे. जो आपल्याला लांबून देखील दिसतो. लाल रंगानंतर पिवळ्या रंगाची वेवलेन्थ सर्वात जास्त असते. पिवळ्या रंगाचे लॅटरल पेरीफेरल व्हिजन लाल रंगाच्या तुलनेत साधारण १.२४ पट जास्त असतो. याचाच अर्थ इतर कोणत्याही रंगाच्या तुलनेत हा रंग लांबून सहज दिसतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या सुरुवातीला स्टेशनचं नाव लिहण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो.

First published:

Tags: Indian railway, Railway, Social media, Social media trends, Top trending, Viral