मुंबई 09 जानेवारी : हल्ली सायबर क्राईम आणि ओटीपी संबंधीत बरेच फ्रॉड समोर येत आहेत. यामध्ये ठग्यांकडून लोकांना गंडा घालून फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे लोकांमध्ये जागृकता करण्यात आली आहे. पण असं असलं तरी देखील ही ठग मंडळी देखील अती हुशार आहेत. ते नेहमीच लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीक्स आणत असतात. असाच एक विचित्र प्रकार एका महिलेसोबत घडला. फक्त फोनवर बोलता-बोलता या तरुणीच्या बँकेतील पैसे उडाले आहेत. आता तुम्हा हा प्रश्न नक्कीच पडला असेल की नक्की तिच्यासोबत असं काय घडलं असेल किंवा या ठगांनी कोणती ट्रीक वापरली असावी, चला हे प्रकरण काय आहे हे समजून घेऊ, जेणे करुन तुम्हाल भविष्यात असा प्रकारापासून वाचता येईल. हे ही पाहा : फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय एका ऑस्ट्रेलियन मुलीने या सगळ्या प्रकारामुळे तिच्या स्वप्नातील घरासाठी जमवलेले पैसे गमावले आहे. अरोरा कॅसिली असे या महिलेचं नाव आहे. कोणीतरी या महिलेच्या बँक खात्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर जे घडले ते खूपच धक्कादायक होतं. गेल्या वर्षी 3 डिसेंबर रोजी, कॅसेलीला तिच्या बँकेकडून एक संदेश आला, ज्यामध्ये असे म्हटले होते की कोणीतरी तिच्या खात्यातून ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत आहे. हा संदेश पाहाता तो NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) कडून आला असावा, तसेच हा मेसेज बँकेच्या व्यवहारांच्या टेक्ट मेसेजमध्ये आला होता, ज्यामध्ये तिच्या आधीच्या व्यवहाराची देखील माहिती होती. हा नंबर बँकेचा अधिकृत नंबर देखील होता. या प्रकारच्या टेक्निकला स्पूफिंग म्हणून ओळखले जाते, सामान्यता ठग्यांकडून वापरले जाते. यासंदेशमध्ये तिला हा व्यवहार थांबवण्यासाठी 1800 वर कॉल करण्याचं आवाहन केलं. म्हणून मग घाबरलेल्या कॅसिलीने काहीही विचार न करता या नंबरवर कॉल करण्याचा निर्णय घेतला. कॅसिलीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने मदतीसाठी फोन नंबर डायल केला तेव्हा तिला बँकेतील जसा कॉल असतो, तसंच भासवलं गेलं. तिला या कॉलवर बोलण्यासाठी तासभर थांबवण्यात आले. त्यानंतर समोरील व्यक्तीने NAB कार्यकर्ता असल्याचे भासवत कॅसिलीला सांगितले की तिचे खाते एका अज्ञात व्यक्तीने ऍक्सेस केले आहे. ज्यामुळे तु तुझे खाते एका वेगळ्या आणि सुरक्षित खात्यात जमा कर. कॅसिलीला त्या माणसाचे म्हणणे पटले आणि तिने त्याच्या आयुष्यातील 36,561 डॉलर्स (भारतीय रुपये 30,10,944.59) त्या खात्यात जमा केले. पैसे ट्रान्सफर झाल्याची पुष्टी केल्यानंतर काही सेकंदांनंतर त्या व्यक्तीने कॉल डिस्कनेक्ट केला. त्याने ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते ते NAB चे नसून कॉमनवेल्थचे असल्याचे कॅसिलीच्या लक्षात आले.
यानंतर, कॅसिली ने बँकेशी संपर्क साधला परंतु बँकेने आपल्याकडून कोणतीही चूक झाली असल्याचे नाकारले. तसेच हा व्यवहार स्वत: कॅसिलीने केला असल्याचं सांगितलं. ज्यानंतर कॅसिलीचे एनएबीला जबाबदार धरले आहे. तिचे म्हणणे आहे, त्यांच्याकडून अधिक सुरक्षा उपाय योजले जावे जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही.