मराठी बातम्या /बातम्या /Viral /लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? मग असा साजरा करा 'व्हॅलेंटाइन्स डे'

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? मग असा साजरा करा 'व्हॅलेंटाइन्स डे'

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असताना  ‘व्हॅलेंटाइन्स डे' साजरा करण्याच्या काही खास टिप्स

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असताना ‘व्हॅलेंटाइन्स डे' साजरा करण्याच्या काही खास टिप्स

व्हॅलेंटाइन्स डे ला दिवशी लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांना खूप एकटं वाटतं. यासोबतच या दिवशी लोक आपल्या पार्टनरला खूप मिस करतात. त्यामुळे काही टिप्स फॉलो करून तुम्ही शरीराने दूर राहूनही तुमच्या पार्टनरबरोबर व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकता.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, ९ फेब्रुवारी : ‘व्हॅलेंटाइन्स डे ’ला जोडप्यांना एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडतो. मात्र, लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना इच्छा असूनही त्यांच्या पार्टनरबरोबर व्हॅलेंटाइन डे साजरा करता येत नाही. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाइन्स डे काही खास पद्धतीने साजरा करून तुम्ही हा दिवस खास बनवू शकता. मुख्य म्हणजे पार्टनरपासून दूर राहूनही तुम्ही त्यांच्याजवळ असल्याचा फील घेऊ शकता.

    व्हॅलेंटाइन्स डेला दिवशी लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांना खूप एकटं वाटतं. यासोबतच या दिवशी लोक आपल्या पार्टनरला खूप मिस करतात. त्यामुळे काही टिप्स फॉलो करून तुम्ही शरीराने दूर राहूनही तुमच्या पार्टनरबरोबर व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याच्या टिप्स.

    हे ही वाचा  : Live-in Relationship बाबत A to Z माहिती, सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं! पाहा Video

    तुमच्या पार्टनरबरोबर डेट प्लॅन करा :

    व्हॅलेंटाइन्स डेला तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर व्हर्च्युअल डेट प्लॅन करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे घर सजवून तुमच्या पार्टनरला व्हिडिओ कॉल करू शकता. तसंच तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर व्हर्च्युअल कँडल लाईट डिनर करू शकता. या शिवाय तुम्ही एकमेकांच्या आवडत्या डिशची ऑर्डर देऊन हा दिवस खास आणि रोमँटिक बनवू शकता.

    छान गिफ्ट द्या :

    लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असताना, तुम्ही तुमच्या पार्टनरला व्हॅलेंटाइन डेला त्यांचं आवडतं गिफ्टदेखील देऊ शकता. तुम्ही तिथे नसल्याने ऑनलाइन ऑर्डर करून किंवा एखाद्या मित्राबरोबर गिफ्ट पाठवून, तुम्ही तुमच्या पार्टरनरला एक सुंदर व्हॅलेंटाइन सरप्राईज देऊ शकता.

    रोमँटिक चित्रपट पाहा :

    व्हॅलेंटाइन्स डेला तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर एखादा रोमँटिक चित्रपटदेखील पाहू शकता. या माध्यमातून तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर क्वालिटी टाइम घालवू शकता. तसेच लाँग डिस्टन्समध्ये असूनही तुम्ही व्हॅलेंटाइन्स डे अतिशय खास पद्धतीने साजरा करू शकता.

    हे ही वाचा  : Kiss चे अनेक किस्से; हे 8 फायदे वाचले तर नवा संकल्पच कराल!

    पार्टनरला मेसेज पाठवा :

    व्हॅलेंटाइन डेला तुम्ही तुमच्या पार्टनरला एक सुंदर आणि  प्रेमळ मेसेजदेखील पाठवू शकता. या मेसेजमध्ये तुम्ही तुमचं प्रेम जाहीरपणे व्यक्त करू शकता. तसंच, तुमच्या जीवनात तुमच्या पार्टनरचं महत्त्व सांगून तुम्ही त्यांचा दिवस खास बनवू शकता. याशिवाय व्हॅलेंटाइन डेला पार्टनरला व्हॉईस नोट पाठवणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.

    अशा रितीने तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असूनही व्हॅलेंटाइन डे उत्तम पद्धतीने साजरा करू शकता. दोघांनाही एकमेकांबरोबर वेळ घालवता येईल, तसेच गिफ्टसची देवाण-घेवाणही होईल.

    First published:

    Tags: Love, Valentine Day, Valentine day plans, Valentine week