मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Kiss चे अनेक किस्से; हे 8 फायदे वाचले तर नवा संकल्पच कराल!

Kiss चे अनेक किस्से; हे 8 फायदे वाचले तर नवा संकल्पच कराल!

आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर ‘किस’ केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर ‘किस’ केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर ‘किस’ केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : अनेक चित्रपटांमध्ये अलीकडे किसिंग सीन्स सर्रास वापरले जातात. पाश्चिमात्यांचं अंधानुकरण अशी त्यावर टीका होत असली तरी आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर ‘किस’ केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. काही तज्ज्ञांच्या मते, किस केल्यामुळे जोडीदारासोबतचं नातं घट्ट होतंच, शिवाय आनंदी व तणावमुक्त आयुष्य मिळतं. त्याव्यतिरिक्तही याचे अनेक फायदे आहेत. 'फीलगुड फॅमिली' या वेबसाइटने त्याबाबत माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

    किस करणं ही केवळ एक छोटीशी शारीरिक क्रिया असली, तरी त्यामागे अनेक कारणं व परिणामही लपलेले आहेत. विशेषतः जोडीदारासोबतचं नातं दृढ करण्याच्या दृष्टीनं त्याला जास्त महत्त्व आहे. त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. किस केल्यामुळे ताण हलका होतो आणि रक्तात epinephrine सोडलं जातं. त्यामुळे रक्ताचं लवकर पंपिंग होतं. यामुळे शरीरातलं एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत मिळते. किसिंगमुळे शरीराला उत्तम प्रकारे टेस्टॉस्टेरॉन हॉर्मोन मिळतं.

    आपल्या तोंडात असणाऱ्या म्युकस मेंब्रेनमध्ये टेस्टॉस्टेरॉन हॉर्मोन शोषलं जाऊ शकतं. ओपन माउथ किसिंगमध्ये पुरुषांच्या तोंडातून स्त्रियांच्या तोंडात टेस्टॉस्टेरॉन हार्मोन्स जातात. ते म्युकस मेंब्रेनमध्ये शोषले जातात. यामुळे स्त्रियांची कामेच्छा वाढते, असं Kissing: Everything You Ever Wanted to Know about One of Life's Sweetest Pleasures या पुस्तकाच्या लेखिका Andréa Demirjian यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते दररोज किस केल्याने शरीराच्या अनेक तक्रारी कमी होऊ शकतात.

    लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्येही दणक्यात साजरा करा व्हॅलेंटाइन डे, वाचा भन्नाट आयडिया

    हॅपी हॉर्मोन्स स्रवतात

    किस केल्यामुळे सेरोटॉनिन, डोपामाइन आणि ऑक्सिटॉसिन ही हॉर्मोन्स स्रवतात. यामुळे आनंदाची भावना जागृत होते व नातंही दृढ होतं. “ऑक्सिटॉसिन हे प्रेम वाढवणारं हॉर्मोन असून ते जितकं जास्त तितकी प्रेम करण्याची क्षमता जास्त असते. जे निष्ठेनं प्रेम करत नाहीत, त्यांच्यात हे हॉर्मोन कमी असल्याचंही दिसून आलं आहे,” असं सायकोथेरपिस्ट Arthur Janov यांचं मत आहे. आपल्या ओठांवरही काही संवेदनशील न्यूरॉन्स असतात. त्यामुळे दुसऱ्या ओठांचा स्पर्श होताच ते उत्तेजित होतात. यामुळे सेबम ग्रंथींमधून स्राव बाहेर पडतो. एखादं नातं मजबूत करण्यात या स्रावामुळे मदत होते.

    रक्तदाब कमी होतो

    किस केल्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे रक्तदाब कमी होतो. मन शांत होतं.

    दातांची कीड कमी होते

    किस केल्यामुळे लाळ अधिक स्रवली जाते. यामुळे दातांवरची कीड कमी होण्यास मदत होते; मात्र किसिंगमुळे तोंडातल्या जिवाणूंचा संसर्ग होण्याचीही भीती असते. किस केल्यामुळे अगदी आईकडून बाळालाही तोंडातल्या किडीचा संसर्ग होऊ शकतो.

    डोकंदुखी आणि पेटके कमी होतात

    किसिंगमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावून आणखीही काही फायदे होतात. यामुळे डोकंदुखी कमी होते व स्त्रियांमधल्या पाळीच्या दरम्यान येणारे पेटके कमी होतात.

    चेहऱ्याचे स्नायू सुस्थितीत आणणं

    किसमुळे चेहऱ्याच्या स्नायूंचं कार्य वाढून गळा आणि हनुवटीला चांगला आकार मिळतो.

    कॅलरीज बर्न होतात

    एखाद्या जोमदार किसमुळे शरीरातल्या 8-16 कॅलरी कमी होतात. अर्थात यामुळे व्यायाम कमी करून चालणार नाही.

    जोडीदाराची योग्यता तपासण्यात मदत

    एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा किस केल्यानंतर त्याच्यासोबतचं नातं पुढे न्यायचं की नाही हे ठरवायला मदत होते, असं बहुतांश स्त्री-पुरुषांचं मत असल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलंय. पुरुषांची योग्य जोडीदार म्हणून तपासणी करण्यासाठीची यंत्रणा असंच स्त्रिया त्याकडे पाहतात.

    स्वप्रतिष्ठा वाढवतात

    कामावर जाण्याआधी ज्या पुरुषांना एक पॅशनेट किस मिळतो, ते अधिक पैसे कमावतात, असं एका अभ्यासात आढळून आलंय. म्हणजेच तुमचं खासगी आयुष्य आनंदी असेल तर तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करता व जास्त चांगलं काम करू शकता.

    किस केल्यामुळे आनंदाची भावना जागृत होते व ताण कमी होतो. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्याचं महत्त्व अधोरेखित होतं.

    First published:

    Tags: Health, Kiss