जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Interesting Facts : वीज कशी तयार होते, ती आपल्यासाठी धोकादायक का असते? तुम्हाला माहितीय?

Interesting Facts : वीज कशी तयार होते, ती आपल्यासाठी धोकादायक का असते? तुम्हाला माहितीय?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आकाशात ही प्राणघातक वीज तयार कशी होते याचा कधी विचार केला आहे का? आणि जिथे वीज पडते तिथे ती कसा कहर कसा निर्माण करते? याबद्दल जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : देशातील काही भागात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. जोराचा पाऊस पडला की मग वीज देखील कडाडू लागले. पाऊस आणि वीजेचं नातं हे फारच जुनं आहे. थंडगार वारा, पाऊस आणि वीज ही खिडकीतून घराबाहेर पहायला फारच भारी वाटतं. पण कधी कधी ही वीज जीवघेणी ठरते. ती कुणाच्या ही घरावर पडली तरी राख होते, कुणाच्या पिकावर पडली तर त्याची नासाडी होते. पण आकाशात ही प्राणघातक वीज तयार कशी होते याचा कधी विचार केला आहे का? आणि जिथे वीज पडते तिथे ती कसा कहर कसा निर्माण करते? याबद्दल जाणून घेऊ. शास्त्रज्ञांनी या प्रश्नांचा सखोल अभ्यास केला आहे आणि वीज पडण्याच्या घटना पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा घडत असल्याचे आढळून आले आहे. Interesting Facts : सूर्यफुल नेहमी सूर्याच्या दिशेने का फिरते? गडद ढगांमध्ये पाणी कसे भरते? ओलावा आणि उबदार हवेच्या वाढीसह विज चमकणे सुरू होते. सामान्यत: कडक उन्हाच्या दिवसात अचानक पाऊस पडला की आकाशात विजांचा लखलखाट होतो. शास्त्रज्ञांच्या मते, सूर्यप्रकाशामुळे पृथ्वी तासन्तास तापते, तेव्हा पृथ्वीवरील आर्द्रता असलेली गरम हवा वेगाने वरच्या दिशेने वाढते. थंड हवेपेक्षा गरम हवा जास्त दाट असते. त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक आहे. गरम हवेच्या वाढीमुळे पाण्याच्या थेंबामध्ये ऊर्जा वाहू लागते. या प्रक्रियेमुळे ढगांमधून उष्णता निघू लागते. जेव्हा हे सुमारे 30 मिनिटे चालू राहते, तेव्हा ढगांमध्ये प्रचंड गडगडाट होतो. त्याचा परिणाम 10 किलोमीटरपर्यंतच्या भागावर होतो. कारण हवेचे वाढते वस्तुमान वरच्या दिशेने न जाता सर्वत्र पसरते. स्तन नाही तरही आपल्या पिल्लांना दूध पाजतं कबुतर, कसं? जाणून वाटेल आश्चर्य ढगांमध्ये वीज कशी तयार होते? खरं तर, जेव्हा थंड हवा आणि उबदार हवा एकत्र येते तेव्हा उबदार हवा वर येते आणि ढगांमध्ये गडगडाट निर्माण होतो. थंड हवेत बर्फाचे स्फटिक आणि उबदार हवेत पाण्याचे थेंब असतात. वादळादरम्यान, हे थेंब आणि स्फटिक एकमेकांवर आदळतात आणि हवेत तुटतात. या घर्षणामुळे ढगांमध्ये वीज निर्माण होते. खरं तर ढगांमध्येही बॅटरीप्रमाणे ‘प्लस’ आणि ‘मायनस’ असतात. जेव्हा खालील चार्ज पुरेसे मजबूत होते, तेव्हा ढगातून ऊर्जा सोडली जाते. तेव्हा आपल्याला वीज कडाडल्याचं दिसतं. विजा धोकादायक का बनतात? जेव्हा ऊर्जा-आधारित विद्युत शॉक बाहेर येतो तेव्हा त्याला लीडर स्ट्रोक म्हणतात. ते जमिनीवरही पडू शकते. लीडर स्ट्रोक एका ढगातून दुसऱ्या ढगात जाऊ शकतो. आकाशीय विद्युल्लता अनेकदा झिगझॅग रेषा बनवते परंतु त्यासाठी कोणतेही निश्चित सूत्र नाही. त्यातून विजेचा लखलखाट निर्माण होतो. ढगांमध्ये हवेचा दाब कसा आहे आणि उबदार हवा आणि थंड हवेची टक्कर किती वेगवान आहे यावर ते अवलंबून असते. त्यांची टक्कर जितकी जलद होईल तितका त्याचा परिणाम जमिनीवर जास्त धोकादायक असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात