मुंबई, 20 जून : सूर्यफुलाला तुम्ही पाहिलं असेल. यापासून तेल निघते. तसेच याच्या बिया खाल्ल्या जातात. पण तुम्ही कधी या फुलाला शेतात उगताना पाहिलंय? ज्यांनी याची शेती केली आहे किंवा गावाकडच्या लोकांनी हे फुल वाढताना पाहिलं असेलच. खरंतर सुर्य उगवल्यावर जसजसा सूर्य वर जातो तसतशी ही फुलं देखील वरच्या बाजूला होतात. परंतू जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा ही फुलं कोमेजतात आणि खालच्या बाजून झुकतात. पण असं का होतं? सुर्याच्या दिशेनेच ही फुलं का जातात असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल? सूर्यफुलाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. जसे की ते थंडीच्या तुलनेत उन्हाळ्यात ते अधिक सक्रिय राहते. त्याच्या फुलाची दिशा दिवसभर बदलत राहते. ज्या ठिकाणी 6 तासांपेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाश असतो त्या ठिकाणी ते चांगले वाढते. ते अशा वातावरणात अधिक विकसित होते, जिथे तीव्र उष्णता असते. हस्तिदंत इतके महाग का? त्यात नक्की असं असतं तरी काय? भीषण उन्हाळा आला तरी सूर्यफुलाला काही फरक पडत नाही, असेही सांगितले जाते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यफूल फुलाची दिशा पाहून तुम्हाला समजू शकते की सूर्य कुठे आहे. सूर्याने आपली जागा बदलली की हे फुल देखील आपली जागा बदलते. हे सगळं जादू प्रमाणे वाटतं पण तरी देखील ते जादू नाही तर त्यामागे शास्त्रीय कारण आहे. सूर्यफुलाचे नवीन फूल जुन्या फुलांपेक्षा सूर्याला लगेच प्रतिसाद देतं. या फुलाची ही खास क्रिया जाणून घेण्यासाठी तुम्हाला ती पहावी लागेल. सर्व प्रथम सूर्योदयापूर्वी तुम्ही त्या फुलाला पाहा. तुम्हाला आढळेल की सर्व फुले पूर्वेकडे आहेत परंतु अद्याप पूर्णतः फुललेली नाहीत. आपण त्यांना पाहून सांगू शकता की ते फुलण्यास तयार आहेत. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा फुलांकडे पाहा. नवीन आणि ताज्या फुलांचे गुच्छ सूर्याकडे तोंड करून सूर्यकिरणांचा आनंद घेत असल्याचे तुम्हाला दिसेल. या फुलात काही जुनी फुले देखील आहेत, जे शांत आहेत. त्यांचा सूर्याच्या किरणांशी फारसा संबंध नाही. नवीन फुले पूर्वेकडे बहरलेली दिसतील, तर जुनी फुले पश्चिमेकडे जवळजवळ कोमेजलेली दिसतील. जर आपण वैज्ञानिक आधारावर तपास केला तर आपल्या लक्षात येईल की, सूर्यफुलाची फुले पूर्वेकडे उमलणे किंवा सूर्याच्या हालचालीचे अनुसरण करणे ही एक विशेष पद्धत आहे, ज्याला विज्ञानात हेलिओट्रोपिझम म्हणतात. या पद्धतीद्वारे सूर्यफुलाची फुले सकाळी सूर्याच्या दिशेने फुलतात आणि सूर्य पश्चिमेकडे मावळतो, त्यामुळे फुलेही पश्चिमेकडे सरकतात. पण रात्री ते पुन्हा पूर्वेकडे दिशा बदलतात आणि सकाळपर्यंत सूर्योदयाची वाट पाहत असतात. हेलिओट्रोपिझम म्हणजे काय 2016 मध्ये, हेलिओट्रॉपिझमवर एक गंभीर अभ्यास केला गेला. या अभ्यासात असे सांगण्यात आले की, ज्याप्रमाणे मानवामध्ये ‘जैविक घड्याळ’ असते जे सूर्याच्या चक्रावर अवलंबून असते, त्याचप्रकारे सूर्यफुलाच्या फुलांमध्येही हे घड्याळ आढळते. हे घड्याळ सूर्यप्रकाश ओळखते आणि फुलांना त्या दिशेने वळण्यास प्रवृत्त करते. जैविक घड्याळ फुलांच्या जनुकांवर परिणाम करते, ज्यामुळे फुलांची दिशा सूर्याच्या किरणांकडे वळते. 24 तासांच्या ‘सर्केडियन रिदम’चा उल्लेख संशोधनात करण्यात आला. यामध्ये सूर्यफुलाची फुले माणसांप्रमाणेच रात्री विश्रांती घेतात आणि दिवसा सक्रिय राहतात असे सांगितले आहे. जसजशी किरणं वाढत जातात तसतशी फुलांची क्रिया वाढते. हे खरे कारण आहे सूर्यफुलाच्या फुलांना माणसासारखे स्नायू नसतात, मग ते सूर्यकिरणांचा पाठलाग कसा करतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो. फुले सूर्योदयाच्या वेळी कशी चढतात आणि सूर्यास्ताच्या वेळी खाली कशी पडतात? नवीन सूर्यफूल वनस्पतींचे देठ रात्रीच्या वेळी विकसित किंवा अधिक वाढतात. पण त्याच्या फांदीमध्ये हा विकास पश्चिमेकडेच होतो. त्यामुळे देठावरील फुले आपोआप पूर्वेकडे झुकतात. जसजसा दिवस पुढे सरकतो तसतशी देठांच्या वाढीची दिशा बदलते. देठ पूर्वेकडे वाढतात आणि त्यावरील फुले पश्चिमेकडे झुकतात. हे चक्र सतत चालू राहते आणि फुले आणि देठांची दिशा बदलत राहते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.