मुंबई 19 जानेवारी : सोशल मीडियावर एक व्हिडीओ भलताच व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की एका बाळाजवळ तीन महिला उभ्या आहेत आणि त्या काहीतरी बोलतायत, तेव्हाच या लोकांवर मोठा ढिगारा पडला, ज्यामधून एक महिलेनं कसाबसा जीव वाचवला. खरंतर ही घटना ब्राझीलमधील बालनेरियो कंबोरिउ शहरातील आहे. अचानक वरून ढिगारा पडला आणि त्याखालीच तीन महिला आणि बाळ होतं. ज्यामध्ये दोन महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याचं लोक म्हणत आहेत. खरंतर वरच्या मजल्यावरुन गाडी खाली पडल्याने हा अपघात झाला आहे. ही कार खाली पडल्यानंतर देखील या कारमधला ड्रायव्हर जिवंत होता. तो कारचा दरवाजा खोलून बाहेर आला. हे ही पाहा : Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि… हा व्हिडीओ पाहाताना असं दिसत आहे की हा मोठा ढागारा दोन महिलांवर आणि मुलावर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा. अनेकांनी या तिघांनाही मृत झाल्याचे समजले. पण ते म्हणतात ना नशिब बलवत्तर असेल तर तुमचं कोणीही काही वाकडं करु शकणार नाही आणि तसंच या प्रकरणात घडलं. इतका मोठा अपघात होऊन देखील या घटनेजवळ उपस्थीत असलेल्या सर्वच लोकांचे प्राण वाचले आहेत. ऑनलाइन शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला मुलाला घेऊन बाहेर फिरायला जाते, तर आणखी दोन महिला तिच्या शेजारी उभ्या आहेत. नशीब इतकं चांगलं की गॅरेजमध्ये उभी केलेली गाडी अशा ठिकाणी पडली जिथे कोणीच नसतं. ज्यामुळे सर्वच लोक बचावले आहेत. मोठा ढिगारा त्याच्या अंगावर पडला तरी त्यांचा जीव वाचला. यासगळ्यात एका महिलेला गंभीर दुखापत झाला आहे. ज्यामुळे तिले एअर एम्ब्युलेंसने रुग्णालयात नेण्यात आले. या महिलेला छाती आणि पेल्विक एरियाला मार लागला आहे आणि तिच्यावर उपचार सुरु आहे. पण इतर दोन महिला आणि लहान बाळाला काहीही झालेलं नाही. त्यांना थोडंफार खरचंटलं आहे.
एसयूव्हीच्या ड्रायव्हरने सांगितले की, त्याच्या कारमध्ये ‘मेकॅनिकल बिघाड’ झाला, ज्यामुळे ही घटना घडली. लष्करी पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी तो पीडितांना मदत न करता निघून गेला होता, ज्यामुळे त्याला अटक केली जाईल. हे ही पाहा : Video Viral: रस्त्यावर क्रिकेट खेळत होते तरुण, अचानक भरधाव बाईक आली आणि… मिलिटरी पोलिस सार्जंट डेनिसिओ फ्रान्सिस्को रोसा यांनी सांगितले की, “कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा त्यांचा दावा आहे. परिणामी ड्रायवरचा कारवरील नियंत्रण सुटला आणि कार भिंतीवर आदळली.”