मुंबई 28 नोव्हेंबर : भारतात क्रिकेट प्रेमींची कमी नाही. पाहाण्यासोबतच लोकांना खेळण्याचं देखील वेळ आहे. त्यामुळे कुठे ही आणि कधीही वेळ मिळाला की मुलं क्रिकेट खेळू लागतात. इतकंच काय तर रस्त्याने चालताना किंवा ऑफिसमध्ये देखील अनेक लोकांना सवय असते. ते बॅटने बॉल मारण्याची एक्टिंग करतात. तर कधी बॉल टाकण्याची एक्टींग करतात. या शिवाय वेळ मिळाला की लोक क्रिकेट खेळायला पळतात. यामुळेच भारतात गल्ली क्रिकेट देखील जास्त फेमस आहे. लहानमुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत बरेच लोक हे मैदान असू देत किंवा गल्ली, तसेच रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसतात. बऱ्याचदा मुलं असे रस्ते शोधतात, जिथे जास्त गाड्या येत नाही. पण कितीही असलं तरी रस्ताच तो, म्हटल्यावर एकादी तरी गाडी येणारच. हे ही पाहा : रस्ता अपघाताचा थरारक Video, डंपर चालकानं गाडीवरील तरुणीला चिरडलं एक सोशल मीडियावर या संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडच्या आवाजासह तो ऐकायला फारच मनोरंजक वाटत आहे. पण असं असलं तरी हा खूप सिरिअस इशू आहे. मुलं क्रिकेट खेळत असल्यामुळे एका बाईक चालकाचा अपघात झाला आहे. ज्यामुळे त्याला दुखापत झाली आहे.
सड़क पर क्रिकेट खेलना बिल्कुल भी सही नहीं है...#Trending #TrendingNow #trendingNews #Viral pic.twitter.com/O10yjw8es2
— Narendra Singh (@NarendraNeer007) November 28, 2022
या व्हिडीओच्या सुरुवातीला काही मुलं रिकाम्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडीओमधील लोकेशन पाहून असंच वाटत आहे की हा व्हिडीओ एखाद्या गावातील आहे. तेव्हाच मागून एक भरधाव वेगाने बाईक येते आणि ते बॅटिंग करत असणाऱ्या तरुणाला कळत नाही. हा तरुण देखील खेळत राहातो आणि रन काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यामागूनच तो बाईकवाला येतो. दोघांची जोरदार धडक होते आणि तो दोघंही पडतात.
या सगळ्यात क्रिकेट खेळणाऱ्या मुलाला फारसं लागत नाही, पण असं असलं तरी बाईक चालकाला मात्र गंभीर दुखापत होते. हा काही सेकंदाचा व्हिडीओ Narendra Singh नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्स केल्या आहेत, तसेच अनेकांनी असं रस्त्यावर न खेळण्याचा सल्ला दिला आहे.'