मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि...

Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि...

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे, जो पाहून कोणीही घाबरून जाईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 23 डिसेंबर : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. यांमध्ये रस्ते अपघाताचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

सध्या असाच एक रस्ते अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे जो खूपच धोकादायक आहे.

हे ही पाहा : रस्ता दुर्घटनेचा हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा, भरधाव कार ट्रकच्या मागे गेली आणि...

हा अपघात किती हृदय पिळवटून टाकणारा आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, दुसऱ्या वाहनाला धडकल्यानंतर गाडी चालवणारी व्यक्ती किती उंचावर हवेत उडते, ज्यानंतर ती कित्येक मीटर लांब येऊन पडते.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे, जो पाहून कोणीही घाबरून जाईल. मात्र ही घटना कुठे घडली हे कळू शकलेले नाही. पण हा व्हिडीओ भारतातील नाही हे देखील नक्की.

हे ही पाहा : याचा स्टंट म्हणजे थेट मृत्यूशी गाठ, व्हायरल Video पाहून डोक्याला लावाल हात

हायवेवर अनेक वाहने धावत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, अचानक समोरून येणाऱ्या एका कारचे नियंत्रण सुटते आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना ती धडकते. त्यानंतर हा भयानक अपघात घडला आहे.

समोरून येणारी कार धडकल्यानंतर अनेकवेळा वाहन पलटी झाल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.

ट्विटरवर @ViciousVideos या हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 9 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत सुमारे 40 हजार लोकांनी पाहिला आहे. या क्लिपला 16शेहून अधिक लोकांनी लाईक्स दिले आहेत. हा व्हिडीओ पाहून बहुतांश यूजर्स हैराण झाले आहेत. युजर्सनी व्हिडीओवर विविध कमेंट्स केल्या आहेत.

तसेच हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की सीट बेल्ट लावणं किती महत्वाचं आहे. त्यामुळे वाहान चालवताना नेहमी सतर्क राहा आणि काळजी घ्या. वाहतूकीच्या नियमांचं पालन करा.

First published:
top videos

    Tags: Accident, Shocking accident, Shocking video viral, Viral