मुंबई, 17 मार्च : लाइफ, हेल्थ, गाड्या, एखादी इलेक्ट्रॉिनक वस्तू यांचा इन्शुरन्स तुम्हाला माहिती असेल. तुम्ही असे इन्शुरन्स काढलेही असतील पण तुम्ही तुमचं हार्टब्रेक इन्शुरन्स काढलं आहे का? तुम्हाला ब्रेकअप इन्शुरन्सबाबत माहिती आहे का? कधी याबाबत ऐकलं आहे का? तुम्हालाच काय बहुतेकांना माहिती नसलेला हा इन्शुरन्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चत आला आहे. प्रेमात पडलेल्या कपल साठी हा खास हार्टब्रेक इन्शुरन्स फंड. जोडीदाराने प्रेमात धोका दिल्यावर किंवा काही कारणामुळे ब्रेकअप झाल्यानंतर हा इन्शुरन्स तुम्हाला मिळेल. त्यामुळे ब्रेकअपनंतर मालामाल होण्याची संधी तुमच्याकडे आहे. आता हा असा इन्शुरन्स नेमका कुठे मिळेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल चला तर पाहुयात, हा इन्शुरन्स नेमका काय, कुठे आणि कसा काढायचा. ब्रेकअप झाल्यानंतर बरेच जण दुःखी, निराश होतात, तणावात जातात. पण एक तरुण मात्र ब्रेकअपनंतर खूप आनंदी झाला. कारण ब्रेकअपनंतर त्याला लॉटरी लागली. याचा कारण म्हणजे हाच तरुणाने आपलं हार्टब्रेक इन्शुरन्स केलं होतं, त्यामुळे ब्रेकअप होताच त्याला तब्बल 25 हजार रुपये मिळाले. भांडणामुळे फळफळलं नवरा-बायकोचं नशीब; पत्नीशी भांडला आणि पती झाला करोडपती या तरुणाचा एका तरुणीवर जीव जडला. त्यांच्यात प्रेम झालं. पण नंतर त्यांच्यात बिनसलंही. वाद-भांडणं झालं आणि अखेर ब्रेकअपही झालं. गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करताच त्याला इन्शुरन्सचे 25 हजार रुपये मिळाले. ते कसे ते या ट्वीटमधून तुम्हाला समजेल.
@Prateek_Aaryan नावाच्या ट्विटर युझरने या इन्शुरन्सबाबतची पोस्ट केली आहे. ट्वीटमध्ये त्याने सांगितलं, त्याने आणि त्याच्या गर्लफ्रेंडने जॉईंट अकाऊंट सुरू केलं. त्यात ते दोघंही दर महिन्याला 500 रुपये जमा करत होते. ज्याला प्रेमात धोका मिळेल त्याला हे सर्व पैसे हार्टब्रेक इन्शुरन्स फंड म्हणून मिळतील, असा त्यांच्यात करार झाला. प्रतीकने या इन्शुरन्स ‘रिलेशनशिप के साथ भी, रिलेशनशिप के बाद भी’ अशी टॅगलाईनही दिली आहे. अग्गं बाई! लेकीसह आई, सासू, आजीही प्रेग्नंट; एकाच वेळी 3 पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे PHOTO तुफान VIRAL हे पैसे प्रतीकला मिळाले आहेत, याचा अर्थ प्रतीकच्या गर्लफ्रेंडने त्याला धोका दिला. प्रतीकचं हार्ट ब्रेक झालं आणि त्याला हार्टब्रेकअ इन्शुरनचे पैसे मिळाले.
I got Rs 25000 because my girlfriend cheated on me .When Our relationship started we deposited a monthly Rs 500 each into a joint account during relationship and made a policy that whoever gets cheated on ,will walk away with all money.
— Prateekaaryan 𝕏 (@Prateek_Aaryan) March 15, 2023
That is Heartbreak Insurance Fund ( HIF ).
ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने प्रतीकला या पैशांचं काय करणार असं विचारलं आहे? तर एकाने असा कायदाच असायला हवा असं म्हटलं आहे. तुम्हाला या इन्शुरन्सबाबत काय वाटतं? तुम्ही काढणार का असा इन्शुरन्स? हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.