मराठी बातम्या /बातम्या /Viral /अग्गं बाई! लेकीसह आई, सासू, आजीही प्रेग्नंट; एकाच वेळी 3 पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे PHOTO तुफान VIRAL

अग्गं बाई! लेकीसह आई, सासू, आजीही प्रेग्नंट; एकाच वेळी 3 पिढ्यांच्या प्रेग्नन्सीचे PHOTO तुफान VIRAL

एकाच वेळी 3 पिढ्या प्रेग्नंट

एकाच वेळी 3 पिढ्या प्रेग्नंट

एकाच वेळी 3 पिढीतील महिला प्रेग्नंट झाल्याच्या प्रेग्नन्सीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 17 मार्च : तसे तुम्ही प्रेग्नन्सी किंवा मॅटरनिटी फोटोशूटचे बरेच फोटो पाहिले असतील. असेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचं कारणही तसंच आहे. या फोटोत एकाच वेळी तीन पिढ्या एकत्र प्रेग्नंट असल्याचं दिसतं आहे. घरातल्या लेकीसह तिची आई, सासू आणि आजीही प्रेग्नंट झाली आहे. प्रेग्नन्सीच्या या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तसं घरात नवा चिमुकला पाहुणा येणार असेल तर त्याचा आनंद सर्वांनाच होतो. कुणी आई-बाबा होणार म्हणून, कुणी आजी-आजोबा होणार म्हणून, कुणी काका-काकी होणार म्हणून तर कुणी मामा-मामी होणार म्हणून... प्रत्येकाला आपल्या या गोड प्रमोशनचा आनंद होतो. पण विचार करा, जर अशी गूड न्यूज एकाच घरातील तीन पिढ्यांनी एकाच वेळी एकत्र दिली तर... अशाच प्रेग्नन्सीचे हे फोटो आहेत. ज्यात एका तरुण महिलेसह मध्यम वयोगटातील आणि वृद्ध महिलाचंही बेबी बम्प दिसत आहे.

तुम्हाला माहिती आहे का? बायकोच्या प्रेग्नन्सीवेळी नवराही असतो 'प्रेग्नंट'; दिसतात अशी लक्षणं

हे फोटो पाहिल्यानंतर खरंच एकाच वेळी तीन पिढ्या प्रेग्नंट झाल्या का? हो तर हे कसं शक्य आहे? असे एक ना दोन किती तरी प्रश्न कित्येकांना पडले आहेत. या 3 पिढ्यांच्या एकत्र प्रेग्नन्सीचं सत्य काय आहे?

प्रेग्न्सीचे हे फोटो काढले आहेत ते जिबिन जॉयने. जो एक फोटोग्राफर आहे. जिबिनने हे मॅटरनिटी फोटोशूट केलं आहे. त्याची बायको चिंचू पीएसचं हे मॅटरनिटी फोटोशूट आहे. ज्यात जिबिनचं कुटुंब दिसतं आहे. त्याच्या बायकोसह त्याची आई, सासू आणि वयाची 80 ओलांडलेली आजीही प्रेग्नंट दिसते आहे. सर्व दाम्पत्याने अगदी आईबाबा होणार असलेल्या दाम्पत्यांप्रमाणेच पोझ दिल्या आहेत.

नागपूर - आईच्या पोटातच अडकलं बाळ; शरीराबाहेर येईपर्यंत गेली 15 वर्षे, झाली अशी अवस्था

जिबिनला आपल्या पत्नीचं हटके मॅटरनिटी फोटोशूट करायचं होतं. त्याची बायको प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यात असताना त्याला एका फिल्ममुळे भन्नाट आयडिया सुटली. ही आयडिया त्याने कुटुंबाला सांगतिली. त्यांनाही ती आवडली आणि ते जिबिनसह यात सहभागी झाले.  जिबिनने बायकोच्या मॅटरनिटी फोटोशूटमध्ये त्याचे आजी-आजोबा, आई-बाबा आणि सासू-सासऱ्यांनाही दाखवलं. त्याने आऊटडोर फोटोशूट केलं. सर्व पिढीच्या महिलांना त्याने प्रेग्नंट दाखवलं.

हे अनोखं मॅटरनिटी फोटोशूट अनेकांना आवडलं आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हे फोटोशूट कसं वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Photoshoot, Pregnancy, Pregnant, Viral