मराठी बातम्या /बातम्या /Viral /भांडणामुळे फळफळलं नवरा-बायकोचं नशीब; पत्नीशी भांडला आणि पती झाला करोडपती

भांडणामुळे फळफळलं नवरा-बायकोचं नशीब; पत्नीशी भांडला आणि पती झाला करोडपती

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

कपलमधील भांडणामुळे प्रेम वाढतं असं म्हणतात. पण प्रेम वाढण्याशिवाय दामप्त्याचा भांडणाचा असा फायदा ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

कॅनबेरा, 15 मार्च : नवरा-बायको म्हटलं की वाद, भांडणं आलीच. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीत वाद होतात. कधी कधी हा वाद इतका विकोपाला जातो की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. तसं कपलमधील भांडणामुळे प्रेम वाढतं असंही म्हणतात. पण प्रेम वाढण्याशिवाय दामप्त्याचा भांडणाचा एक असा फायदा ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. नवरा-बायकोचं भांडण इतकं लकी ठरलं आहे की एका कपलचं अशाच भांडणामुळे नशीब फळफळलं आहे. भांडणानंतर हे कपल क्षणात करोडपती झालं आहे.

ही कोणतीही फिल्मी स्टोरी किंवा काल्पनिक कथा नाही. हे प्रत्यक्षात घडलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या ओलोंगोंगमधी ही घटना आहे. ही जगभर चर्चेत आली आहे. इथलं एक दाम्पत्य ज्यांच्यात जोरदार भांडण झालं.बायकोशी भांडण केल्यानंतर नवरा घरातून निघून गेला. आता बायको रागावली म्हटल्यावर तिचा राग दूर करण्यासाठी काहीतरी करावं लागणारच होतं. या नवऱ्यानेही तेच केलं. बायकोचा राग दूर करण्यासाठी त्याने असं काही आणलं की यामुळे या दाम्पत्याचं नशीब चमकलं.

शॉपिंगला गेला नवरा, बायकोने उचललं धक्कादायक पाऊल; पती घरी परतताच...

मेट्रो यूकेच्या वृत्तानुसार ही महिला दर आठवड्याला एक लॉटरीचं तिकीट खरेदी करायची. कधी ना कधी आपण लॉटरीमुळे श्रीमंत होऊ असा विश्वास तिला होता. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून ती लॉटरी खरेदी करत होती. एका आठवड्याला तिचा नवरा तिच्यासाठी लॉटरी आणायला विसरला. त्यावरूनच त्यांच्यात भांडण झालं. तेव्हाच नवऱ्याने ठरवलं की पुढच्या आठवड्यात तो दोन लॉटरीचे तिकीट आणणार. त्याने तसंच केलं.

बायकोचा राग घालवण्यासाठी तिला मनवण्यासाठी त्याने त्याच नंबरचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले जे त्याची बायको कित्येक वर्षांपासून खरेदी करत होती. महिलेने आपली जन्माची आणि लग्नाची तारीख एकत्र करून एक नंबर तयार केला होता आणि या नंबरचं लॉटरीचं तिकीट ते कित्येक वर्षांपासून खरेदी करत होती. जतिच्या या प्रेमाच्या नंबरची जादू चाललीच.  या दाम्पत्याच्या प्रेमाला, विश्वाला कदाचित देवानेही तडा जाऊ दिला नाही. त्यानेही आपली कृपा केली असं म्हणायला हरकत नाही.

पत्नीसाठी पतीने एकाच वेळी खरेदी केलेल्या या दोन्ही लॉटरी लागल्या. प्रत्येकी एक मिलियन डॉलर्सची एक अशी दोन मिलियन डॉलर्सची लॉटरी हे कपल जिंकलं. म्हणजे तब्बल 16 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांचे ते मालक बनले. इतकी मोठी लॉटरी जिंकल्याचा आनंद बायकोला काही आवरला नाही. ती बेशुद्धच झाली. नवऱ्यालाही यावर विश्वास बसत नव्हता.

इश्श, पुरे आता! आजोबांनी सर्वांसमोर असं काय केलं की आजीबाई लाजली? वृद्ध दाम्पत्याचा VIDEO तुफान व्हायरल

क्षणात करोडपती झालेल्या या दाम्पत्याने आता हे पैसे खर्च करण्यासाठी प्लॅनिंग केलं आहे. सर्वात आधी ते आपल्या मुलीसाठी एक घर खरेदी करणार आहेत. त्यानंतर काही पैसे नातवंडांसाठी जमा करून ठेवणार आणि उरलेल्या पैशांतून ते दोघंही फिरणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Couple, Lottery, Wife and husband