नवी दिल्ली 23 जानेवारी : देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटनाही आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Accident Video Viral) होत आहे. हायवेवर ज्यापद्धतीने एका कारचा अपघात झाला, ते पाहून तुमचाही थरकाप उडेल. मात्र हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल की इतक्यात भीषण अपघातातही चालकाला खरचटलंही नाही.
आईचं प्रेम! पिल्लाला वाचवण्यासाठी थेट सापासोबत भिडली उंदरीण; हैराण करणारा VIDEO
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की कारवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्ड रेलला (Guard Rail) धडकते. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की कारच्या मधोमध गार्ड रेल शिरलं आहे आणि पूर्ण कारमधून आरपार शिरत ते बाहेर निघालं आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी कारची स्थिती पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की या कारचा इतका भीषण अपघात झालेला आहे की गार्ड रेल कारच्या आरपार गेला आहे. कारच्या आतमध्येही गार्ड रेलं दिसतं. तुम्ही पाहू शकता, की इतक्यात भीषण अपघातातही चालकाचं सीट मात्र सुरक्षित आहे. बाकी संपूर्ण गाडी गार्ड रेलमुळे तुटलेली दिसते. मात्र सुदैवाने इतक्या भयंकर अपघातातही ड्रायव्हर सुरक्षित आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही कार चालकालाही पाहू शकता. या अपघातात त्याला खरचटलंही नाही. अपघातानंतर तो कारमधून उतरून रस्त्याच्या कडेला जाऊन बसतो. व्हिडिओमध्ये आजूबाजूला काही लोक उभा दिसतात. तर ड्रायव्हर आरामात रस्त्याच्या कडेला बसलेला दिसतो. हा व्हिडिओ punjabi_industry नावाच्या पेजवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.