Home /News /viral /

आईचं प्रेम! पिल्लाला वाचवण्यासाठी थेट सापासोबत भिडली उंदरीण; हैराण करणारा VIDEO

आईचं प्रेम! पिल्लाला वाचवण्यासाठी थेट सापासोबत भिडली उंदरीण; हैराण करणारा VIDEO

या व्हिडिओमध्ये दिसतं की एक मादा उंदरीण आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी थेट सापासोबतच भिडली (Mouse and Snake Fight Video). हा व्हिडिओ खरोखरच हैराण करणारा आहे

  नवी दिल्ली 23 जानेवारी : आईचं स्थान हे जगात सर्वात वरती असतं. मग ती आई माणसाची असो किंवा एखाद्या प्राण्याची आणि इतर जिवाची. आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला सदैव तयार असते (Mother Love). आपल्या लेकरांसाठी आई दिवसरात्र काहीही पाहात नाही. तिच्यासाठी फक्त आपली मुलं महत्त्वाची असतात. आपल्या मुलांना आनंदात पाहाण्यासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार असते. मुलांवर कोणतंही संकट येऊ नये, त्यांना दुखापत होऊ नये तसंच कोणत्या अडचणी येऊ नयेत, यासाठी आई सदैव प्रयत्न करत असते. सध्या अशाच एका आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Mouse) होत आहे. वय वर्षे 35, दिसतोही धडधाकट; तरी हा लहान मुलांसारखं दररोज घालतो डायपर कारण... या व्हिडिओमध्ये दिसतं की एक मादा उंदरीण आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी थेट सापासोबतच भिडली (Mouse and Snake Fight Video). हा व्हिडिओ खरोखरच हैराण करणारा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक साप उंदराच्या पिल्लाला आपल्या तोंडात पकडून घेऊन चालला आहे. तर उंदरीण पिल्लाला वाचवण्यासाठी सापाच्या मागे धावत आहे. उंदीर सापाच्या शेपटीला चावा घेत आहे. जेणेकरून सापाने पिल्लाला सोडावं. पहिल्यांदा तर सापाने तरीही तोंडातील पिल्लू सोडलं नाही. मात्र, नंतर उंदरीणीने अगदी जोरात चावा घेण्यात सुरुवात केली. यानंतर सापाने पिल्लाला सोडलं. यानंतरही उंदरीणीचा राग शांत झाला नाही. त्याने सापाला दूर पळवून लावलं. साप आपल्या पिल्लापासून लांब गेला आहे, याची खात्री झाल्यानंतर उंदरीण पिल्लाजवळ परत गेली. सुदैवाने हे पिल्लू सुखरूप होतं. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुरेंदर मेहरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं 'अस्तित्व आणि जीवनासाठी संघर्ष ही निसर्गातील प्रत्येक प्रजातीची मूळ प्रवृत्ती आहे.'

  असे गार्ड तर शोधूनही सापडणार नाहीत; पाहा बेडकांचा हा भन्नाट VIDEO

  अवघ्या 50 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, साप आणि उंदराच्या विलक्षण हालचाली. तर दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिलं, आई नेहमीच महान असते.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Mother, Shocking video viral

  पुढील बातम्या