मुंबई, 22 जानेवारी : तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं असेल मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ नये म्हणून त्यांची देखरेख करण्यासाठी भरपूर पैसे देऊन गार्ड्स ठेवले जातात. शिवाय घर किंवा घरातील सुरक्षा करण्यासाठी सर्वात प्रसिद्ध प्राणी कोणता आहे तर तो कुत्रा. पण तुम्ही कधी कोणत्या बेडकांना कोणत्या वस्तूची सुरक्षा करताना पाहिलं आहे का? (frogs guarding mobile) सध्या अशाच बेडकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (frogs mobile video). पावसात तुम्ही बेडकांना पाहिलं असेल. पाण्याच्या डबक्यात डराँव डराँव आवाज करत बेडकांना तुम्ही उड्या मारताना पाहिलं असेल (frogs funny video). तशी बेडकं माणसांसाठी फार कामाची नाहीत. पण आता पहिल्यांदाच बेडुक माणसांसाठीही काम करताना दिसलं आहे. बेडकांनी चक्क एका मोबाईल फोनची रखवाली केली आहे. बेडुक आपल्या कामात इतके गंभीर आणि चोख आहेत की व्हिडीओ पाहिल्यानंतर असे गार्ड्स शोधूनही सापडणार नाहीत असंच तुम्ही म्हणाला. @MorissaSchwartz नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आळा आहे. राणीच्या रखवालदारांपेक्षाही हे गंभीर आहेत, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हे वाचा - बोलणारे पोपट खूप पाहिले आता या पोपटाचा VIDEO पाहा; कान,डोळ्यावर विश्वास बसणार ना व्हिडीओत पाहू शकता चार बेडुक एका मोबाईल फोनची रखवाली करत आहेत. त्यावेळी एक व्यक्ती त्या बेडकांजवळ असलेला मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करते. जशी ती व्यक्ती आपला हात त्या मोबाईलजवळ नेत, तशी बसलेले सर्व बेडुक अलर्ट होतात. त्यानंतर ती आपला हात मागे घेते. ती पुन्हा मोबाईलजवळ हात नेते, तेव्हा बेडुक पुन्हा सावध होऊन ओरडू लागतात. असं खूप वेळा होतं.
They’re more serious than the Queen’s guards! https://t.co/odvSmT3fFx
— Morissa Schwartz 📚 (Dr. Rissy) (@MorissaSchwartz) January 20, 2022
अखेर ती व्यक्ती मोबाईलला स्पर्श करते, तेव्हा एक बेडुक तिच्यावर हल्लाच करते. ते रागात पटकन तिच्या हातावर बसतं. तेव्हा मात्र ती व्यक्ती आपला हात लगेच मागे घेते आणि बेडुक मोबाईलवर बसून राहतं. पण चारपैकी एकही बेडुक मोबाईलला हात लावू देत नाही. हे वाचा - हुश्शार कावळा! तहान भागवण्यासाठी पक्षाने चालवलं डोकं, VIDEO पाहून व्हाल अवाक बेडकांचं असं रूप पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं आहे. हे कोणत्या प्रकारचे बेडुक आहेत, असं एका युझरने विचारलं आहेत. तर एका युझरने अन्य प्रजातींनाही फोनचं व्यसन जडत आहे, अशी कमेंट केली आहे.