मुंबई 28 ऑगस्ट 2022 : लोकांमध्ये इंटरनेटचा वापर खूपच वाढला आहे. कोरोना काळानंतर तर लहनांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक मनोरंजनासाठी इंटरनेकडे वळले आहेत. तसंच हे असं माध्यम आहे, जिथे आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती अगदी एका क्लीकवर मिळते. यासाठी बरेचसे लोक हे गुगल वर अवलंबून असतात. म्हणजे अगदी काहाही माहिती मिळवायची म्हटलं तरी ‘‘गुगल बाबा’‘ला ती माहित नाही हे शक्य नाही. तुम्ही त्याला काहाही विचारा तो तुमच्यासाठी कुठून ना कुठून माहिती घेऊन येणारच. सध्या गुगल सर्चसाठी एका शहराची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे सध्या या शहरात असं काही सर्च होतंय त्याची पोलखोल गुगलने केली. धक्कादायक अहवाल समोर आणि सर्वांच्या नजरा आश्चर्याने उंचावल्या आहेत. आज गुगल जी माहिती घेऊन आला आहे, ती सर्वांसाठीच धक्कादायक आहे. गुगल आपल्या समोर बनारसमधील सर्च डेटा घेऊन आला आहे. हे फार कमी लोकांना माहित आहे की, गुगल आपला सर्च डेटा स्टोअर करुन ठेवतो, हा डेटा त्याला तुम्हाला माहिती पुरवण्यासाठी कामाला येतो, तसेच तो हा डेटा काही रिसर्च कंपनीना पुरवतो. ज्यामुळे हे तर नक्की आहे की, तुम्ही काय करता? काय सर्च करता यावर गुगलची नजर असतेच. बनारसच्या डेटामध्ये काय समोर आलं आहे? बनारसमधील गुगल डेटाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बनारसमध्ये आठवड्याच्या शेवटी जे काही घडत आहे, त्यामध्ये समाजविरोधी कृत्य आणि भ्रष्ट मानसिकता उघड झाली आहे. बनारसमध्ये वीकेंडला ‘कॉल गर्ल’चा शोध अधिक होत असल्याचे समोर आले आहे आणि याची आकडेवारी पाहून तुम्हाला धक्का बसेल. हे वाचा : Google क्रोम वापरत असाल तर सावधान! केंद्र सरकारकडून अलर्ट जारी खरंतर शनिवारी गुगल ट्रेंडमध्ये कॉर्ल गर्ल हा शब्द ट्रेंडिंगमध्ये दिसला. जो पहिल्या क्रमांकावर होता. गुगलवरून दररोज बनारस प्रांतात गुगलवर सर्च केलेल्या शब्दांचा अहवाल गुगल ट्रेंड्समध्ये सतत अपडेट केला जातो. पण या वीकेंडसाठी गुगल सर्च केलेले शब्द वाराणसीच्या प्रतिमेला न्याय देणारे दिसत नाहीत. वाराणसीमध्ये सहसा दर शनिवारी, लोक ‘कॉल गर्ल इन वाराणसी’ किंवा ‘वाराणसी कॉल गर्ल’ सारखे शब्द Google वर शोधत असल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी दुपारी 1 ते 2 या वेळेत ‘कॉल गर्ल इन वाराणसी’ हा शब्द गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा शब्द बनला. म्हणजे गुगल सर्चमध्ये हा शब्द वाराणसीमध्ये पहिल्या क्रमांकावर आला. त्याच वेळी, स्पा आणि मसाज केंद्रांचे अहवाल देखील सर्च रिपोर्टमध्ये दिसले. आहेत. हे वाचा : तुमच्या फोनमध्ये Spyware तर नाही ना? असं करा चेक, खूपच सोपी आहे पद्धत! सकाळी 11 वाजता 88 लोकांनी शोध घेतला, त्यानंतर दुपारी दोन वाजता हा आकडा शंभरच्या जवळपास पोहोचला. याचा अर्थ असा की, दिवसाच्या शेवटी, Google वर या आक्षेपार्ह अनैतिक कृत्याचा भाग होण्यासाठी दोनशेहून अधिक लोक उत्सुक होते. या अनैतिक कृत्याशी संबंधित शब्द शोधणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याने दुपारनंतर हा शब्द गुगल ट्रेंड व्हायराल सुरुवात झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.