जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google क्रोम वापरत असाल तर सावधान! केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

Google क्रोम वापरत असाल तर सावधान! केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

Google क्रोम वापरत असाल तर सावधान! केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीईआरटी-इनने डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी एक चेतावणी जारी केली आहे. CERT-In ला Google Chrome मध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. ज्याद्वारे हॅकर्स याचा फायदा घेऊन हॅक करू शकतात

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : इंटरनेटचा (Internet) वापर ही काळाची गरज बनली आहे. सर्वच गोष्टी ऑनलाइन झाल्याने इंटरनेटचा वापर वाढला आहे. नेमक्या याच गोष्टीचा फायदा हॅकर्स (Hackers) घेताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांत सिस्टीम हॅक करणं, सायबर गुन्हेगारी यांसारख्या (Cyber Crime) घटनांमध्ये वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारी टाळण्यासाठी तज्ज्ञ आणि सुरक्षा यंत्रणा सातत्याने युझर्सना सूचना देताना दिसतात. इंटरनेट म्हणजे गुगल हे समीकरण पाहायला मिळतं. गुगल सर्च, गुगल फोटोज, गुगल क्रोम आदींचा वापर करणाऱ्या युझर्सची संख्या मोठी आहे; मात्र गुगल क्रोमविषयी (Google Chrome) केंद्र सरकारने युझर्सना धोक्याचा इशारा दिला आहे. युझर्सनी हॅकिंग टाळण्यासाठी गुगल क्रोमचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करून घ्यावं, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. या सर्व गोष्टींमागे एक महत्त्वाचं कारण आहे. ब्राउजिंगसाठी गुगल क्रोमचा वापर करत असाल, तर आता सावध व्हा. हे सांगण्याचं कारण म्हणजे, आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (Indian Computer Emergency Response Team) अर्थात CERT-In ने युझर्सना डेस्कटॉपसाठीच्या गुगल क्रोमबाबत अनेक असुरक्षित गोष्टींविषयी इशारा दिला आहे. `सीईआरटी-इन`ने दिलेल्या माहितीनुसार, गुगल क्रोममध्ये काही दोष आढळून आले आहेत. हॅकर्स या दोषांचा फायदा घेऊन तुमचा कम्प्युटर अगदी सहजपणे हॅक करू शकतात. गुगल क्रोममध्ये सापडले हे दोष `सीइआरटी-इन`च्या एका सल्लागाराने दिलेल्या माहितीनुसार, `गुगल क्रोममध्ये अनेक दोष आहेत. या दोषांचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या सिस्टीमवर बनावट रिक्वेस्ट पाठवून त्या माध्यमातून ऑर्बिटरी कोड एक्झिक्युट (Arbitrary code Execute) करू शकतात. हा कोड तुमच्या कम्प्युटरच्या सुरक्षेला चकवा देऊ शकतो.` `सीइआरटी-इन`ने इशारा देताना म्हटलं आहे की, फेडसीएम, स्विफ्टशॅडर, ब्लिंक, साइन-इन-फ्लो, क्रोम ओएस शेल निःशुल्क वापरल्याने या त्रुटी त्यात आहेत. 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत ‘हे’ 5 स्मार्टफोन; फिचर्सही आहेत खास यापूर्वीदेखील सीईआरटी-इनने अ‍ॅपल आयओएस, अ‍ॅपल आयपॅड आणि मॅक ओएसच्या बग्जबाबत धोक्याची सूचना जारी केली होती. अ‍ॅपल डिव्हाइसच्या (Apple Device) ऑपरेटिंग सिस्टिममध्ये एक बग आहे. त्याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात, असं या सूचनेत नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर अ‍ॅपलने आपल्या युझर्सना इमर्जन्सी अपडेट तात्काळ अपडेट करण्यास सांगितलं होतं. सुरक्षेसाठी करा हे काम हॅकिंगपासून बचाव करण्यासाठी युझर्सनी सर्वप्रथम गुगल क्रोम अपडेट करून लेटेस्ट व्हर्जन (Latest Version) करून घेणं गरजेचं आहे. तसंच युझर्सनी अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अनोळखी वेबसाइटवर जाणं टाळावं. या गोष्टींचं पालन केल्यास तुमची सिस्टीम हॅक होण्याचा धोका टळेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Google
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात