दिल्ली, 09 नोव्हेंबर : कपलचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच अशा कपलच्या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बाईकवरून प्रवास करणारं हे कपल. यावेळी गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसोबत असं काही केलं की मृत्यू चालेल पण अशी गर्लफ्रेंड नको, असं अनेकांना वाटतं आहे. असं या व्हिडीओत नेमकं काय घडलं तुम्ही पाहा.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक कपल बाईकवरून जातं आहे. बॉयफ्रेंड गाडी चालवतो आहे आणि बाईकच्या मागच्या सीटवर बसली आहे. जी मोबाईलवर आपला व्हिडीओ शूट करते आहे. बॉयफ्रेंड मध्ये मध्ये मोबाईल कॅमेऱ्याकडे पाहतो. थोड्या वेळाने गर्लफ्रेंड त्याला पुन्हा कॅमेऱ्याकडे पाहायला सांगते. त्याचवेळी बाईक कुठेतरी धडकते. बाईकचा अपघात होतो.
हे वाचा - प्रेयसीला पळवण्यासाठी गावी पोहोचला तरुण, पण प्रकरण असं पेलटलं की नदीत मारली उडी
बाईकसह दोघंही कोसळतात. पण यानंतर गर्लफ्रेंड हातात मोबाईल घेऊन पुन्हा उभी राहते आणि आपला व्हिडीओ बनवू लागते. तिच्या मागे बाईक पडलेली दिसते. तिचा बॉयफ्रेंड मात्र तिच्यासोबत नाही तो बाईकसह दुसरीकडे फेकला गेला आहे.
अपघातातून बचावलेल्या गर्लफ्रेंडने अशा स्थितीत आपल्या बॉयफ्रेंडसाठी धावणं अपेक्षित होतं पण ती व्हिडीओ शूट करत राहिली आहे. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
memecentral.backup इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 'मृत्यू चालेल पण अशी गर्लफ्रेंड नको' असं कॅप्शन या व्हिडीओवर देण्यात आलं आहे.
हे वाचा - 19 वर्षांच्या तरुणाचं 56 वर्षीय महिलेवर जडलं प्रेम आणि... पुढची कहाणी विश्वास न बसण्यासारखीच
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच तरुणांच्या कमेंट येत आहेत. एका युझरने हे काय दुःख, वेदना आहेत. असं म्हटलं आहे. तर एका आपण सिंगलच ठिक आहे, अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं किंवा तुम्हाला कशी गर्लफ्रेंड नको आणि कशी हवी हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Bike accident, Boyfriend, Couple, Girlfriend, Viral, Viral videos