मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रेयसीला पळवण्यासाठी गावी पोहोचला तरुण, पण प्रकरण असं पेलटलं की नदीत मारली उडी

प्रेयसीला पळवण्यासाठी गावी पोहोचला तरुण, पण प्रकरण असं पेलटलं की नदीत मारली उडी

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

प्रेम कहाणीचा हायवोल्टेज ड्रामा असा काही सुरु झाला की प्रकरण पोहोचलं नदीपर्यंत, नक्की असं काय घडलं?

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई 8 नोव्हेंबर : प्रेमासाठी वाट्टेल ते, अशी म्हण प्रचलितआहे. एखाद्या व्यक्तीवरच्या प्रेमासाठी प्रियकर-प्रेयसी कुठल्याही टोकाला जाऊ शकतात, याची अनेक उदाहरणं आहेत. असाच एक प्रकार उत्तराखंडमधल्या पौडी जनपद परिसरातल्या बैजरो भागात घडला. प्रेयसीला पळवून नेण्यासाठी तरुण त्याच्या मित्रासोबत दिल्लीतून ढुलमोट सेराघाट नावाच्या गावात पोहोचला; पण संतप्त ग्रामस्थ त्यांना पकडण्यासाठी मागे लागताच प्रियकराने नदीत उडी घेतली. त्याच्यासोबतचा मित्र मात्र गावकऱ्यांच्या हाती सापडला. त्याची सर्वांनी चांगलीच धुलाई केली. नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं.

    पौडी जनपदच्या बैजरो परिसरात दोन तासांपर्यंत हा हायव्होल्टेज ड्रामा घडला. त्याचं झालं असं, की दिल्लीतला तरुण ढुलमोट सेराघाट गावातल्या तरुणीवर जीवापाड प्रेम करत होता. त्यामुळे मित्राला सोबत घेऊन तो प्रेयसीला पळवून नेण्यासाठी गावात दाखल झाला. ग्रामस्थांना याची कुणकुण लागताच त्यांनी दोघांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग सुरू केला. ग्रामस्थांच्या हाती लागलो तर आपलं काही खरं नाही, हे समजताच दोघेही पळत सुटले.

    प्रेयसीला पळवण्यासाठी गावी पोहोचला तरुण, पण प्रकरण असं पलटलं की नदीत मारली उडी

    जीव वाचवण्यासाठी प्रियकराने आदी दरीत आणि मग नयार नदीत उडी घेतली. तरुण बुडत असल्याने आजूबाजूच्या गावातल्या काही नागरिकानी त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, त्याच्या मित्राला मात्र तोपर्यंत ग्रामस्थांनी चांगलंच बदडून काढलं होतं.

    अखेर प्रियकरासोबत लग्नाची तयारी

    गेल्या अनेक दिवसांपासून तरुण व तरुणीचं प्रेम होतं. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. परंतु तरुणीच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळताच तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी करण्याचा निर्णय घेतला होता. याची माहिती मिळताच तो तरुण अस्वस्थ झाला व मित्राला सोबत घेऊन त्याने थेट प्रेयसीचं गाव गाठलं.

    प्रेयसीला पळवून नेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यानं त्यानं तिला पळवून नेण्यासाठी पूर्ण नियोजन केलं होतं; पण ग्रामस्थांना त्याची कुणकुण लागल्याने तरुण आणि त्याचा मित्र पकडले गेले. नदीतून बाहेर काढून प्रियकराचा जीव वाचवल्यानंतर काही जणांच्या मध्यस्थीनं प्रियकर-प्रेयसीचा विवाह निश्चित करण्याचा निर्णय झाला.

    प्रेमासाठी प्रियकर-प्रेयसी समाजातला विरोध झुगारून कुठल्याही थराला जाऊ शकतात. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्यासोबतच आयुष्य जगता यावं म्हणून अनेकदा जीवाची पर्वाही करत नाहीत. उत्तराखंडमधल्या प्रेमी जोडप्याचं उदाहरणही त्यापैकी एक आहे; पण तरुणीला पळवून नेण्याचं नियोजन फिसकटलं, तर प्रियकर-प्रेयसीसोबतच मित्रालाही याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, हे या प्रकरणावरून दिसून येतं.

    First published:

    Tags: Love story, Shocking, Viral