मराठी बातम्या /बातम्या /Viral /19 वर्षांच्या तरुणाचं 56 वर्षीय महिलेवर जडलं प्रेम आणि... पुढची कहाणी विश्वास न बसण्यासारखीच

19 वर्षांच्या तरुणाचं 56 वर्षीय महिलेवर जडलं प्रेम आणि... पुढची कहाणी विश्वास न बसण्यासारखीच

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हे दर्शवणाऱ्या अनेक घटना अलीकडे घडत आहेत, त्यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई 8 नोव्हेंबर : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हे दर्शवणाऱ्या अनेक घटना अलीकडे घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एक 19 वर्षीय तरुणी 50 वर्षं वय असलेल्या पुरुषाच्या प्रेमात पडल्याची घटना ऐकीवात आली होती. त्यानंतर आता अशीच एक आणखी घटना समोर आलीये. यामध्ये 19 वर्षांच्या तरुणाचं 56 वर्षांच्या महिलेवर प्रेम जडलंय. दोघांनी साखरपुडा केलाय. हा मुलगा पहिल्यांदा महिलेला भेटला तेव्हा त्याचं वय 10 वर्षं होतं. वयात 37 वर्षांचं अंतर असूनही दोघे प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये आले.

    ही घटना थायलंडच्या नाखोन प्रांतातलं आहे. 19 वर्षांचा वुथिचाई चँटराज आणि 56 वर्षांची जनला नामुआंग्राक एकमेकांच्या शेजारी राहत होते. जानला घटस्फोटित असून, ती एकटीच राहत होती. त्यामुळे घरातल्या कामात मदत करण्यासाठी ती वुथिचाईला घरी बोलावत असे. घरकामात मदत करताना दोघांची चांगली मैत्री झाली.

    हे ही वाचा : राजस्थानमधील ही 3 गावं मुलींसाठी नरकापेक्षा कमी नाही

    आता त्यांच्या रिलेशनशिपला दोन वर्षं झाली आहेत. ते शहरातल्या प्रसिद्ध ठिकाणी आणि रेस्टॉरंटमध्ये डेटवर जात असतात. या जोडप्याने सांगितलं, की वयातल्या 37 वर्षांच्या अंतराने त्यांना काहीही फरक पडत नाही. सार्वजनिक ठिकाणी किस करताना आणि हात धरतानाही दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत नाही.

    रिलेशनशिपबद्दल बोलताना वुथिचाई म्हणाला, ‘मी जनलासोबत 2 वर्षांपासून आहे. माझ्या आयुष्यातली ही पहिलीच वेळ आहे, की मला कोणाचं तरी जीवन सुखकर करावंसं वाटत आहे. ती खूप मेहनती आणि प्रामाणिक आहे. मला ती खूप आवडते.’

    जनला घटस्फोटित आहे. 20 वर्षांच्या संसारानंतर ती आधीच्या पतीपासून विभक्त झाली. तिला तीन मुलं आहेत. जानलाच्या मुलांचं वय 30 वर्षांच्या आसपास आहे; मात्र आता जानला वुथिचाईशी दुसरं लग्न करण्याचा विचार करत आहे.

    जनला म्हणाली, ‘वुथिचाई माझ्यासाठी सुपरहिरोसारखा आहे. तो मला रोज मदत करतो. तो मोठा झाल्यावर आमच्यात फीलिंग्ज निर्माण झाल्या. जेव्हा आम्ही आमच्या प्रेमाबद्दल इतरांना सांगतो तेव्हा ते आम्हाला वेडे समजतात. जेव्हा मी माझ्या मुलांना आम्हा दोघांच्या नात्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं; पण वुथिचाई मला तरुण असल्यासारखं फील करायला लावतो. आम्ही एकत्र राहतो व आम्ही आनंदी आहोत. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत.’

    First published:

    Tags: Love story, Marathi news, Shocking news, Top trending, Viral news