कैरो, 24 ऑगस्ट : प्रेम आंधळं असतं, प्रेमात लोक वाट्टेल ते करायला तयार होतात. प्रेमाचे असे हटके आणि भन्नाट किस्से तुम्हाला माहिती असतील. पण सध्या प्रेमाचा असा किस्सा समोर आला आहे, ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. प्रेमात एका तरुणाने धक्कादायक पाऊल उचललं आहे. त्याची गर्लफ्रेंड परीक्षेत फेल झाली म्हणून त्याने थेट शाळेलाच आग लावली. इजिप्तच्या मेनोयुफिया प्रांतातील एका शाळेतील ही घटना. 21 वर्षांचा तरुण ज्याचं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न ठरलं होतं. त्यांचा साखरपुडा झाला होता. नुकतीच त्याच्या होणाऱ्या बायकोची शाळेची परीक्षा झाली. पण या परीक्षेत ती नापास झाली. त्यानंतर तरुण इतका संतप्त झाला की त्याने शाळाच पेटवली. ज्यामुळे शाळेचा कंट्रोल रूम जळून खाक झाला. महत्त्वाची कागदपत्रं जळाली. सुदैवाने यावेळी शाळेत जीवितहानी झालेली नाही. कुणाचा मृत्यू झाला नाही किंवा कुणी जखमी झालेलं नाही. काही वेळात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. हे वाचा - IT इंजीनिअर तरुणीचे ब्रेकअप, प्रियकराशी संपर्क साधायला घेतली चक्क मांत्रिकाची मदत, 9 लाखांचा गंडा शाळेला आग लावल्यानंतर तरुण पळून गेला आणि आपल्या गावात जाऊन लपून बसला. पण काही लोकांनी त्याला पाहिलं होतं. तसा त्याचा शोध घेण्यात आला आणि पोलिसांनी त्याला शोधून काढलंच. आज तक ने द नॅशनलच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी या तरुणाला अटक केली. पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याने असं पाऊल का उचललं याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने धक्कादायक खुलासा केला. हे वाचा - वर्गाबाहेर विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकाला बेदम मारहाण; संतापजनक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, Video होणारी बायको परीक्षेत फेल झाल्याने तिला आता पुन्हा त्याच वर्गात शिकावं लागेल. यामुळे आपलं लग्न मोडण्याची भीती त्याला होती. म्हणून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.