जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / IT इंजीनिअर तरुणीचे ब्रेकअप, प्रियकराशी संपर्क साधायला घेतली चक्क मांत्रिकाची मदत, 9 लाखांचा गंडा

IT इंजीनिअर तरुणीचे ब्रेकअप, प्रियकराशी संपर्क साधायला घेतली चक्क मांत्रिकाची मदत, 9 लाखांचा गंडा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या तरुणीचे नांदेड येथे राहणाऱ्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

  • -MIN READ Panvel,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

पनवेल, 23 ऑगस्ट : मांत्रिकाने एका प्रेयसीला तब्बल लाखोंचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ब्रेकअप झालेल्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून देण्याच्या बहाण्याने या मांत्रिकाने एका 27 वर्षीय तरुणीकडून ऑनलाईन 8 लाख 95 हजाराची रक्कम उकळत तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी आरोपी मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - फसवणूक झालेल्या तरुणीचे वय 27 आहे. ती कॉम्प्युटर इंजिनीअर असून खारघरमध्ये मैत्रिणीसह राहते. तसेच मुंबईतील एक आयटी कंपनीत कामाला आहे. या तरुणीचे नांदेड येथे राहणाऱ्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे प्रेमसंबंध तुटले. यानंतर तरुणीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. अखेर, संपर्क होत नसल्याने वशीकरणाचा आधार घेण्याचा प्रयत्न या तरुणीने केला. म्हणे जादूने प्रियकर येऊन जाईल… 27 वर्षीय कॉम्युटर इंजिनीअर असणाऱ्या या तरुणीने रुखसार नावाच्या महिलेशी संपर्क साधला. तिने जादुई शक्तीने खानसाहेब तिच्या प्रियकराला तिच्यापर्यंत घेऊन येईल, असे सांगितले. त्यानुसार तरुणीने खानसाहेबशी संपर्क साधला. यावेळी खानसाहेबने तिच्याकडे प्रियकराचा फोटो व 50 हजार रुपये मागितले. ते तिने पाठवून दिले. मात्र, यानंतरही आरोपी खानसाहेबने वेगवेगळी कारणे सांगून तिची फसवणूक केली. तसेच तिला थापा मारत या तरुणीकडून एकूण 8 लाख 95 हजार रुपये उकळले. हेही वाचा -  प्रेयसीने हात पकडले अन् मैत्रिणीने पाय; पतीने अत्यंत क्रूरपणे प्रीतीला एका घावात संपवलं! इतके पैसे दिल्यानंतर देखील काहीच काम न झाल्याने आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे या तरुणीने आरोपी मांत्रिक खानसाहेबकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, त्याने पैशाच्या मागणीमुळे आपला मोबाईल बंद करून टाकला. त्यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणीसोबत याबाबत चर्चा केल्यावर खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी खानसाहेबविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अजून आरोपीला अटक झालेली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात