पणजी 23 ऑगस्ट : गोव्यातील एका शिक्षकाला वर्गाबाहेरच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ शाळेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटना 18 ऑगस्टची असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या मारहाणीमागचं कारण अद्याप उघड झालेलं नाही. शाळेत गेले अन् परतलेच नाही; या फोटोमागील कहाणी ऐकून डोळे पाणावतील! या प्रकरणात PWD अभियंत्याविरुद्ध वालपोई येथील शाळेच्या शिक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. अल्ताफ शेख असं या अभियंत्याचं नाव असून व्हिडिओमध्ये तो गोव्यातील एका शाळेतील शिक्षकाला मारहाण करताना दिसतो.
PWD अभियंत्याकडून गोव्यातील शिक्षकाला बेदम मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/YnOuc4fXKS
— News18Lokmat (@News18lokmat) August 23, 2022
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा अभियंता वर्गाच्या बाहेर उभा आहे. तो हा शिक्षक वर्गातून बाहेर येण्याची वाट बघत आहे. इतक्यात हा शिक्षक बाहेर येतो. हे पाहाताच अभियंता त्याच्या अंगावर धावून जातो आणि मारहाण करण्यास सुरुवात करतो. तो सुरुवातीला शिक्षकाच्या कानशिलात लगावतो आणि नंतर त्याला बाजूला खेचून बेदम मारहाण करताना दिसतो. दहीहंडीचा थरार ठरला क्षणिक, 22 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू, सातव्या थरावरून असा कोसळला, VIDEO काहीच वेळात इतर लोक या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी तिथे येतात आणि अभियंत्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थीही बाहेर येऊन हा सगळा प्रकार पाहात आहेत. मात्र, तो अभियंता कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. भरपूर गर्दी जमा झाल्यावरही हा व्यक्ती शिक्षकाला शेवटपर्यंत मारत राहातो. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.