मुंबई 05 मार्च : आजकाल अशा अनेक घटना घडतात ज्याक लोक काही वस्तू ऑनलाइन ऑर्डर करतात, परंतु त्यांच्या घरी काहीतरी वेगळंच पोहोचतं. आज आम्ही तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत, ज्यात एका तरुणाच्या घरी एक ऑनलाइन गिफ्ट पोहोचलं. हे गिफ्ट त्याने उघडलं तेव्हा त्यामध्ये चक्क बॉम्ब निघाला, इतकंच नाही तर हा बॉम्ब फुटलाही. हा सगळा प्रकार त्या मुलाच्या गर्लफ्रेंडने दुसऱ्या तरुणाचं प्रपोजल नाकारल्याने घडला. तरुणाला जराही कल्पना नव्हती की या गिफ्ट बॉक्समध्ये नेमकं काय आलं आहे.
Shocking Video : स्वयंपाक करताना मोबाईल वापरणं महिलेला भोवलं, घडलं भयानक
ही घटना काहीशी जुनी आहे जी अमेरिकेतील एका शहरात घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एक व्यक्ती पहिल्या नजरेतच एका मुलीच्या प्रेमात पडला होता, परंतु मुलीने तिला बॉयफ्रेंड असल्याचं सांगून नकार दिला. यानंतर त्या व्यक्तीने मुलीच्या प्रियकरालाच मारून टाकण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने मुलीच्या प्रियकराला बॉम्बने उडवण्याचा कट रचला. त्याने एक छोटा बॉम्ब तयार केला.
त्या मुलाने हा बॉम्ब भेटवस्तूसारखा पॅक केला. यानंतर तरुणीच्या प्रियकराच्या घरी त्याची डिलिव्हरी झाली. त्याने हे पॅकेट उघडताच त्याचा स्फोट झाला आणि तो प्रियकर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसरीकडे, गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला, त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं.
13 वर्षाच्या मुलासोबत शारिरीक संबंध, 31 वर्षांची महिला गर्भवती, पण, तुरुंगवास नाही होणार
आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणीलाही या सगळ्याबाबत काहीही कल्पना नव्हती. त्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या जबाबाच्या आधारे तपास केला असता आरोपीची ओळख पटली. आरोपीने घरगुती बॉम्ब तयार केल्याचं सांगण्यात आलं. त्यासाठी त्याने अनेक ठिकाणी तपास करून बॉम्ब बनवण्यासंबंधीचे साहित्य खरेदी केले. बॉम्ब फुटल्याच्या घटनेनंतर काहीच वेळाने यावर निकालही देण्यात आला आणि आरोपीला दोषी ठरवण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Shocking news