अमेरिका, 5 मार्च : सध्या अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, विवाहबाह्य संबंधातून हत्या , सोशल मीडियाच्या माध्यामतून मैत्री नंतर लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण -
अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यातील एका महिलेने 13 वर्षांच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल महिलेला लैंगिक अपराधी घोषित करण्यात आले आहे. तरीही महिलेला तुरुंगात जावे लागणार नाही. याबाबत पीडित मुलाच्या आईने नाराजी व्यक्त केली आहे.
कोलोरॅडोच्या फाउंटन क्षेत्राच्या पोलिसांनी अँड्रिया सेरानोविरुद्ध मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 2022 मध्ये अँड्रियाला अटक करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी महिलेचे वकील आणि फिर्यादीचे वकील यांच्यात एक करार झाला आहे.
यानुसार महिलेला लैंगिक अपराधी मानले गेले आहे. मात्र, या गुन्ह्यासाठी महिलेला तुरुंगात टाकले जाणार नाही. अँड्रिया सेरानोनेही हा करार स्वीकारला आहे. अशा परिस्थितीत आरोपी महिलेला अटक होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, अँड्रियाला अटक झाली तेव्हा ती गर्भवती होती आणि नंतर तिने एका मुलाला जन्म दिला.
लग्न, Extra Marital Affair आणि पैशांसाठी पतीच्या हत्येचा कट, मुंबईला हादरवणाऱ्या घटनेमागील सत्य
मुलाची आई म्हणाली -
त्याचबरोबर पीडित मुलाच्या आईने या करारबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पीडित मुलाच्या आईने सांगितले की, मला माझ्या मुलाचे बालपण चोरीला गेल्यासारखे वाटते. आता तो बाप आहे. तो पीडित आहे आणि आता त्याला आयुष्यभर त्याच्यासोबत जगावे लागणार आहे. जर या प्रकरणात पीडित मुलगी आणि आरोपी पुरुष असता तर नक्कीच शिक्षा वेगळी असती. आरोपी महिला असल्याने तिच्याबद्दल सहानुभूती दाखवली जात आहे, असेही त्यांनी म्हटले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.