मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking Video : स्वयंपाक करताना मोबाईल वापरणं महिलेला भोवलं, घडलं भयानक

Shocking Video : स्वयंपाक करताना मोबाईल वापरणं महिलेला भोवलं, घडलं भयानक

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियाच्या जगात सर्वजण मोबाईलचा अतिवापर करताना दिसतात. आपण कुठेही गेलो तरी 24 तास मोबाईल आपल्या सोबत असतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 5 मार्च : सोशल मीडियाच्या जगात सर्वजण मोबाईलचा अतिवापर करताना दिसतात. आपण कुठेही गेलो तरी 24 तास मोबाईल आपल्या सोबत असतो. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात. कधी कधी त्याच्या तोट्यांनाही सामोरे जावे लागते. सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये तरुणीसोबत मोबाईलचा वापरत करत असताना विचित्र घटना घडली.

एका शेफ मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. एक मुलगी तिच्या स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी उभी असल्याचे दिसत आहे. स्वयंपाक करत असताना ती मुलगी तिचा मोबाईल हातात घेते. ती क्लिक करण्याचा प्रयत्न करताच तिचा हातातून मोबाईल सुटला. मोबाईल सोडताच तो फ्रायपॅनमध्ये पडला. मुलीला काय करावे सुचत नव्हते. तिने लगेच चिमटा उचलते आणि त्यातून मोबाईल काढायला सुरुवात करते. तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

व्हिडिओ पाहून असे वाटते की हा फोन पाण्यात पडला आहे पण तसे नाही. ते पाणी नव्हते तर फ्रायपॅन होता. म्हणून चिमट्याने फोन काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ कमेटंही येताना दिसत आहे. हा संपूर्ण घटना किचनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

दरम्यान, @cctv_videos नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागला. मोबाईलच्या अतिवापरामुळे अशा अनेक दुर्घटना घडतात.

First published:
top videos

    Tags: Social media viral, Top trending, Video viral, Viral news