नवी दिल्ली 12 जानेवारी : कोणालाही कोणावरही प्रेम (Love) होऊ शकतं. मात्र, प्रेम होण्यासाठी एकमेकांना भेटणं किंवा पाहाणंही काही प्रमाणात गरजेचं असतं. परंतु काही लोक असेही असतात, जे एकमेकांना न पाहताही एकमेकांच्या प्रेमात पडतात. असंच प्रेम PubG खेळणाऱ्या तरुण-तरुणीला झालं (PubG Love Story).
दोन अनोळखी लोक PubG खेळताना ऑनलाईन (Online Love Story) भेटले. त्यांचं बोलणं सुरू झालं आणि दोघंही प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही घटना पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमधून समोर आली आहे. कर्नाटकच्या एका तरुणीचं पब्जी खेळताना बंगालच्या एका तरुणावर प्रेम जडलं. यानंतर तरुणीने हैराण करणारं काम केलं.
एअर होस्टेसने केला विमानातील फर्स्ट क्लासबाबतचा मोठा खुलासा; सांगितला आपला अनुभव
मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकमधीलल फ्रिजा नावाची एका तरुणीला पब्जी खेळायला आवडायचं. ती ऑनलाईन पब्जी खेळत असे. पब्जी खेळतानाच तिची ओळख पश्चिम बंगालच्या धूपगुडी येथे राहणाऱ्या सैनूर आलम नावाच्या मुलासोबत ऑनलाईनच झाली. पब्जी खेळतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत आपला मोबाईल नंबर शेअर केला. यानंतर दोघंही बराच वेळ फोनवर बोलत असे.
याआधी दोघंही कधीच एकमेकांना भेटले नव्हते. एकमेकांसोबत फोनवर बोलत असतानाच फ्रिजा आणि सैनूर एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडाले. यानंतर एक दिवस फ्रिजा कर्नाटकातून फ्लाईटने सैनूर आलमच्या धूपगुडी गावात पोहोचली. फ्रिजा थेट या तरुणाच्या घरी गेली. यानंतर सैनूरने जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.
या तरुणीला अचानक आपल्या घराबाहेर पाहून तरुणाच्या घरातील लोकही हैराण झाले. यानंतर दोघांची लव्ह स्टोरी घरच्यांनाही समजली. यानंतर मुलीच्या घरच्यांना बोलावलं गेलं आणि दोन्ही कुटुंबीयांनी मिळून अतिशय उत्साहात दोघांचंही लग्न लावून दिलं.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.