Home /News /viral /

VIDEO - ठुमके लगावणं सोडून महिलांचं एकमेकींना 'दे दणादण'; भांडण सोडवणाऱ्या तरुणालाही तुडवलं

VIDEO - ठुमके लगावणं सोडून महिलांचं एकमेकींना 'दे दणादण'; भांडण सोडवणाऱ्या तरुणालाही तुडवलं

Woman fighting while dancing : डान्स करता करता दोन महिला आपसात भिडल्या.

  मुंबई, 11 जानेवारी : महिलांची भांडणं (Woman fighting video), लढाई तशी काही नवी नाही. अगदी नळावर, बाजारात आणि मुंबईच्या लोकलमध्येही महिलांना तुम्ही भांडताना पाहिलं असेल. आता तर महिला डान्स करतानाही लढताना दिसल्या (Woman fighting while dancing). दोन डान्सर महिलांच्या फायटिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Woman fight on dance stage). डान्स करता करता दोन महिलांमध्ये जबरदस्त फायटिंग रंगली. डान्स राहिला बाजूला त्यांच्यामध्ये WWF च रंगली. ठुमके लगावणं सोडून या दोघींनी एकमेकींना दे दणादण सुरू केलं. डान्सच्या स्टेजला त्यांनी कुस्तीचा आखाडा बनवला. एकमेकींच्या झिंझ्या उपटल्याच पण त्यांच्यातील भांडणं सोडावायला गेलेल्याही त्यांनी तुडव तुडव तुडवलं आहे. व्हिडीओत पाहू शकता दोन महिला लाल रंगाची साडी नेसून आहेत. डान्सच्या स्टेजवर आहेत आणि त्यांचा डान्स पाहण्यासाठी समोर बरेच प्रेक्षकही आहेत.  प्रेक्षक या महिलांचे ठुमके पाहण्यासाठी आतुर होते पण या महिलांनी मात्र या प्रेक्षकांच्या स्वप्नावर पाणी फेरलं. आपला सुंदर डान्स दाखवणं दूर या महिलांनी चक्क फायटिंग सुरू केली. दोघींनीही एकमेकींचे केस धरले आणि एकमेकींवर तुटून पडल्या.  तिथं उपस्थित लोकही हैराण झाले. हे वाचा - लग्नात वाजलेल्या गाण्यामुळे चढला नवरदेवाचा पारा; नवरीबाईला मंडपातच घटस्फोट दिला या महिलांमधील भांडणं सोडवण्यासाठी एक व्यक्ती त्यांच्यामध्ये जाते. पण या महिला इतक्या पेटल्या आहेत की त्या व्यक्तीला स्टेजवर आडवं पाडतात आणि दोघीही त्याच्या पाठीवर लाथा मारतात. त्याला लाथांनी तुडव तुडव तुडवतात.
  official_viralclips नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओ जितका धक्कादायक आहे, तितकाच मजेशीरही वाटतो. पाहिल्यानंतर हसू बिलकुल आवरत नाही. हे वाचा - Shocking! चक्क मगरीसोबत मस्ती करायला गेला; काय भयंकर अवस्था झाली पाहा VIDEO हा व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच कमेंट येत आहे. या महिला आपसात का लढत आहे, असा प्रश्न काही युझर्सना पडला आहे. तर एका युझरने ही लढाई नाटक असल्याचं म्हटलं आहे. एका युझरने तर या महिलांच्या मध्ये पडणाऱ्या तरुणाची मजा घेतली आहे. आता हा तरुण कधीच कोणत्या भांडणात पडणार नाही, असं म्हटलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dance video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या