Home /News /viral /

एअर होस्टेसने केला विमानातील फर्स्ट क्लासबाबतचा मोठा खुलासा; सांगितला आपला अनुभव

एअर होस्टेसने केला विमानातील फर्स्ट क्लासबाबतचा मोठा खुलासा; सांगितला आपला अनुभव

अमेरिकन एअरलाईन्समध्ये काम करणारी माजी एअर होस्टेस केट कमलानी हिने नुकतंच डेली स्टार वेबसाईटसोबत बोलताना प्लेनच्या फर्स्ट क्लास केबिनमध्ये काम करण्याचा आपला अनुभव सांगितला

    नवी दिल्ली 12 जानेवारी : तुम्ही जर कधी विमानातून प्रवास केला असेल तर फ्लाईट अटेन्डेंट्स म्हणजेच एअर होस्टेस आणि त्यांचं काम (Air Hostess Work) नक्कीच पाहिलं असेल. एअर होस्टेसचं काम भरपूर अवघड असतं. एकीकडे त्यांना प्रवाशांच्या सेवेसाठी सतत हजर राहावं लागतं, तर दुसरीकडे स्वतःत्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी लागते. मात्र हे तुम्हाला माहिती आहे का, की विमानाच्या इकोनॉमी आणि फर्स्ट क्लासमध्ये काम करणाऱ्या एअर होस्टेसचं काम वेगवेगळं असतं आणि त्यांचा अनुभवही वेगळा असतो. नुकतंच एका माजी एअर होस्टेसने विमानाच्या फर्स्ट क्लासबद्दलचा मोठा खुलासा केला आहे (Flight Attendant Shared her Experience). अमेरिकन एअरलाईन्समध्ये काम करणारी माजी एअर होस्टेस केट कमलानी हिने नुकतंच डेली स्टार वेबसाईटसोबत बोलताना प्लेनच्या फर्स्ट क्लास केबिनमध्ये काम करण्याचा आपला अनुभव सांगितला. हा अनुभव जाणून तुम्हालाही वाटेल की फर्स्ट क्लास (First Class Cabin) तितकाही आकर्षक नाही, जितका हा लोकांना आकर्षक वाटतो. 1945 साली सैनिकाने आईला लिहिलेलं पत्र; 76 वर्षांनी पोहोचलं घरी, यात काय होतं? रिपोर्टनुसार, केटने नुकताच टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि लोकांना सांगितलं की फर्स्ट क्लासमध्ये काम करणं किती कठीण आहे. इथे काम करणं तसं अजिबात नाही जसं लोकांना वाटतं. ती म्हणाली की फर्स्ट क्लासमध्ये काम करणाऱ्या एअर होस्टेसना चांगल्या सुविधा मिळतात असा सर्वसाधारण समज आहे, पण हे खरं नाही. केटनं सांगितलं की, फर्स्ट क्लासमध्ये काम करण्याचा एकमेव फायदा म्हणजे पगार जास्त. पण त्यासाठी खूप खडतर प्रशिक्षणातून जावं लागतं. अमेरिकेत एअर होस्टेसने देशांतर्गत फ्लाइटने प्रवास केला तर तिला इकॉनॉमी तसंच फर्स्ट क्लासमध्ये सेवा देण्यासाठी पात्र मानलं जातं. परंतु जेव्हा ती आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी प्रवास करते तेव्हा तिला विशेष प्रशिक्षण दिलं जातं. कारसाठी फळविक्रेत्याच्या 'पोटावर लाथ'; लेडी प्रोफेसरच्या संतापजनक कृत्याचा VIDEO सगळ्यात आधी एअर होस्टेसला इंग्रजी शिकणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे, प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी, सेवा देण्यासाठी त्यांना स्वतंत्र प्रशिक्षण दिलं जाते. मात्र, अमेरिकेतील फर्स्ट क्लास एअर होस्टेसचा ट्रेंड सोशल मीडियावर लोकांना मान्य नाही. व्हिडिओवर कमेंट करत एका व्यक्तीने सांगितलं की त्यांच्यापेक्षा अमिराट्स किंवा इतर एअर होस्टेस चांगल्या आहेत, ज्या प्रवाशांची अधिक काळजी घेतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Airplane, Domestic flight

    पुढील बातम्या