जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चक्क कासवाने घेतला कुत्र्यासोबत पंगा; इवल्याशा जीवाची दादागिरी पाहून व्हाल अचंबित, VIDEO

चक्क कासवाने घेतला कुत्र्यासोबत पंगा; इवल्याशा जीवाची दादागिरी पाहून व्हाल अचंबित, VIDEO

चक्क कासवाने घेतला कुत्र्यासोबत पंगा; इवल्याशा जीवाची दादागिरी पाहून व्हाल अचंबित, VIDEO

व्हिडिओमध्ये एक छोटं कासव आणि कुत्रा पाहायला मिळतो. कासव कुत्र्यासोबत अशा पद्धतीने वागत आहे जणू ते कुत्र्यावर रागवून त्याला ओरडत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 11 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेक अजब घटना पाहायला मिळतात. यात अनेकदा हे फोटो, व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही खळखळून हसवणारे असतात. काही फोटो आणि व्हिडिओ असे असतात जे पाहून आपल्याला वाईट वाटतं. तर काही व्हिडिओ पाहून रागही येतो. सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाला थोडाही राग येणार नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थोडं शॉक व्हाल आणि पोट धरून हसाल. या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक कुत्रा आणि कासव यांच्यातील भांडण अतिशय मजेशीर पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. हेही वाचा -  नवरा-बायको दोघांच्याही प्रेमात तरुणी; विचित्र लव्ह स्टोरीचा काय झाला शेवट पाहा हमारा हुबली नावाच्या अकाऊंटवरुन हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये एक छोटं कासव आणि कुत्रा पाहायला मिळतो. कासव कुत्र्यासोबत अशा पद्धतीने वागत आहे जणू ते कुत्र्यावर रागवून त्याला ओरडत आहे (Tortoise Irritates Dog). कासवाच्या या कुत्र्यामुळे मध्येच कुत्रा चिडल्याचं पाहायला मिळतं आणि तो आपल्या तोंडाने कासवाच्या मानेवर हल्ला करतो (Dog and Tortoise Fight Video). मात्र, या प्रत्येक वेळी कासव आपलं डोकं शेलच्या आतमध्ये घेतं.

कासव आणि कुत्र्याच्या या मजेशीर लढाईला व्हॉईसओव्हरही देण्यात आला आहे. हा आवाज ऐकून असं वाटतं जणू ते खरंच बोलत आहेत आणि रस्त्यावर उभा राहून एकमेकांसोबत भांडत आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हाला असं जाणवेल की कासव कुत्र्याला त्रास देत आहे आणि कंटाळून कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो. हेही वाचा -  5 वर्षांच्या लेकीच्या खेळण्यात सापडलं असं काही की पाहताच हादरली आई हा मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत 44 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर जवळपास दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. तसंच हजारो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी सांगितलं की कासव अतिशय वाईट पद्धतीने चावतं. याबद्दल अनेकांना माहितीच नाही. काही लोकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत पाळीव प्राण्यांसोबत असा खेळ करणं चांगलं नसल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात