वॉशिंग्टन, 10 डिसेंबर : लहान मुलं कधी, कशासोबत खेळतील याचा नेम नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक वस्तू म्हणजे एक खेळणंच असतं. अशाच एका पाच वर्षांच्या मुलीच्या खेळण्यात तिच्या आईला असं काही सापडलं ज्यामुळे तिला धक्काच बसला. लेकीच्या खेळण्यात ती गोष्ट पाहून आई शॉकच झाली (Shocking Thing Found in Toy). महिलेने आपला हा अनुभव आपल्या सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे.
क्लारिसा गर्जा (Clarissa Garza) नावाची ही महिला. तिनं आपल्या पाच वर्षांच्या मुलीशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. आपल्या @rissa_xo.xo या टिकटॉक अकाऊंटवर तिने आपला व्हिडीओ (Viral Tiktok Video) पोस्ट केला आहे.
क्लारिसाने सांगितलं, ती आपल्या मुलीचं एक खेळणं पाहत होती. तेव्हा तिला त्यात काही डॉलर मिळाले (Mother Found Money in Daughter’s Toy). त्या खेळण्यातील पैसे ती काढू लागली तेव्हा एक-दोन नाही तर किती तरी नोटा निघाल्या. 1 डॉलर, 20 डॉलर आणि 100 डॉलरच्या बऱ्याच नोटा निघत होत्या. या नोटा मोजल्यानंतर मला धक्काच बसला. एकूण 247 डॉलर म्हणजे जवळपास 20 हजार रुपये त्या खेळण्यात होते (Woman found 20 thousand rupees from toy).
हे वाचा - VIDEO - तहानलेल्या कुत्र्यासाठी धावून आला चिमुकला; जे केलं ते पाहून वाटेल हेवा
खेळण्यात इतके पैसे आले कुठून असा प्रश्न तिला पडला. आई म्हणून मुलीकडे असलेल्या इतक्या पैशांमुळे तिला चिंता वाटू लागली. मुलीजवळ जाऊन तिने तिलाच या पैशांबाबत विचारलं. मुलीने जे उत्तर दिलं ते ऐकून तिला आणखी एक धक्का बसला.
हे पैसे कुठून आले असं क्लारिसाने आपल्या लेकीला विचारताच ती म्हणाली तिच्या पर्समधून. म्हणजे खेळण्यातील ती पैसे क्लारिसाच्या पर्समधील होते. पर्समधून पैसे काढून आपण आपल्याकडे सुरक्षित ठेवले असं त्या मुलीने सांगितलं.
हे वाचा - मुलांनी Instagram वर पाहिला शिक्षिकेचा अश्लील VIDEO; Viral होताच गेली नोकरी
हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जण म्हणाले या मुलीकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत, माझ्या पिगी बँकमध्येही कधी इतके पैसे नव्हते. तर एका युझरने म्हटलं जर तो या आईच्या जागी असता तर मुलीकडे तो पैसे सुरक्षित ठेवायला देता कारण इतक्या कमी वयात तिला पैसे सुरक्षित ठेवायची सवय लागते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Parents and child, Viral, Viral news