Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नवरा-बायको दोघांच्याही प्रेमात पडली तरुणी आणि...; 'पती-पत्नी आणि ती'च्या विचित्र Love story चा काय झाला शेवट पाहा

नवरा-बायको दोघांच्याही प्रेमात पडली तरुणी आणि...; 'पती-पत्नी आणि ती'च्या विचित्र Love story चा काय झाला शेवट पाहा

त्याच्यावर प्रेम करता करता तिचा त्याच्या पत्नीवरही जडला जीव.

त्याच्यावर प्रेम करता करता तिचा त्याच्या पत्नीवरही जडला जीव.

त्याच्यावर प्रेम करता करता तिचा त्याच्या पत्नीवरही जडला जीव.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 10 डिसेंबर : नवरा-बायको (Husband wife) यांच्यामध्ये कुणी तिसरी व्यक्ती आली तर त्यांच्या संसारात भांडणं ही आलीच (Relationship story). पण अमेरिकेतील एका कपलच्या आयुष्यात मात्र तिसरी व्यक्ती आली आणि असं काही घडलं ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. पती-पत्नी और वो म्हटलं तर एकतर पती किंवा पत्नीचे दुसऱ्या कुणाशी तरी संबंध. पण इथं मात्र पती आणि पत्नीच्या आयुष्यात असलेली ती तिसरी व्यक्ती एकच आहे. म्हणजे एक तरुणी नवरा-बायको दोघांच्याही प्रेमात पडली (Woman love wife and husband).

अमेरिकेतील एका महिलेला पती आणि पत्नी दोघांवर प्रेम करू लागली (Love story). आता या लव्ह स्टोरीचा नेमका शेवट कसा असेल? एक तर ती महिला या दोघांपैकी एकासोबत राहिल किंवा दोघंही पती-पत्नी त्या महिलेपासून दूर राहण्याचा किंवा तिला आपल्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतली. पण असं काहीच झालं नाही. या दाम्पत्याने असा निर्णय घेतला ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

रिपोर्टनुसार न्यूयॉर्कमध्ये राहणारी  29  वर्षांचे डॉ. मार्टी कोल नर्स रेबेका बोनोला भेटले. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि जवळीकही वाढली. दोघं आपल्या रिलेशनशिपमध्ये खूप आनंदी होते. रेबेकाला टिंडर अॅववरून समजलं की डॉ. मार्टी यांच नताशासोबतही रिलेशन आहे दोघांचा साखरपुडाही झाला आहे. यानंतर रेबेकाला खूप वाईट वाटलं पण तिने नताशाला भेटायचं ठरवलं.

हे वाचा - तुमच्या एका नजरेतच कुणीही पडेल तुमच्या प्रेमात! तरुणीने दाखवला डोळ्यांचा जादुई इशारा

डॉ. मार्टी यांनी नताशाला आपल्या घरी बोलावलं. तिथंच रेबेका आणि नताशाची पहिली भेट झाली. दोघींमध्ये चांगली मैत्री जमली आणि त्या डॉ. मार्टीच्या घरात एकत्र राहू लागल्या. हळूहळू तिघंही एकमेकांच्या जवळ आले. एक दिवस तर त्या तिघांनी एकत्र शारीरिक संबंधही ठेवले त्यानंतर त्यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं.

काही दिवसांनी डॉ. मार्टी आणि नताशा यांची लग्नाची तारीख ठरली. रेबेकालाही लग्नपत्रिका पाठवण्यात आली. सुरुवातीला तिने लग्नाला न जाण्याचं ठरवलं पण दोघांनीही तिला ती आपल्या लग्नात आली तर खूप बरं वाटेल असं म्हणताच ती लग्नाला जायला तयार झाली. या लग्नात ती एकटी नाही गेली तर आपल्या पालकांनाही घेऊन गेली.

हे वाचा - हृदयाचा थरकाप उडवणारं वेडिंग फोटोशूट तुम्ही पाहिलं का?

लग्नानंतर मार्टी आणि नताशा यांनी रेबेकाला आपल्यासोबत राहायला बोलावलं. रेबेकाच्या पालकांनी याला विरोध केला पण तिने कसंबसं आपल्या पालकांना समजावलं. तेव्हापासून हे तिघंही एक कपल म्हणून एकाच घरात राहत आहेत. प्रेमासाठी आपसात बाँडिंग गरजेची आहे. ती चांगली असेल तर मग कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही, असं रेबेका म्हणाली. आता एक पुरुष आणि दोन महिला असे तिघंही एका घरात सुखाने संसार करत आहेत.

First published:

Tags: America, Lifestyle, Love story, Wife and husband, World news